गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षण (Manoj Jarange Patil) या मुद्द्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. आज म्हजेच मंगळवार ३१ ऑक्टोबर हा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. तर दुसरीकडे संपूर्ण राज्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी अनेक गाड्यांचे नुकसान केले आहे.
राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सुरू झालेली जाळपोळ बंद करा, अन्यथा मला नाइलाजाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला. जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते असावेत, असा अंदाज आहे. सत्ताधाऱ्यांचे असाल, नसाल तरीही जाळपोळ बंद करा, अशी सादही मनोज जरांगे पाटील यांनी घातली.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपला शांततेत लढा सुरू आहे; परंतु काही ठिकाणी होणारी जाळपोळ, उद्रेक पाहता थोडी शंका येत आहे. गोरगरिबांच्या हक्कासाठी हा लढा आहे. त्यामुळे जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका. मला कुठेही जाळपोळ केलेले किंवा नेत्यांच्या घरी गेल्याची बातमी आली तर मला उद्या रात्री प्रेस घेऊन वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही (Manoj Jarange Patil) जरांगे पाटील यांनी दिला.
(हेही वाचा – Dharashiv curfew : आंदोलक आक्रमक : बीडनंतर आता धाराशिवमध्ये संचारबंदी)
जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुढे सांगितले कि, बहुतेक सत्ताधाऱ्यांतीलच लोक कार्यकर्त्यांच्या हाताने घरे जाळून घेताहेत आणि मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनाला डाग लावतायत, असा अंदाज आहे.
आपल्याला आरक्षण मिळणारच. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात सरकार जेरीस येईल. आपल्या दारात कोणीही यायचे नाही आणि त्यांच्या दारात आपण कशामुळे जातोय, असा सवाल करीत तुम्ही सत्ताधाऱ्यांचे असो किंवा सामान्य मराठा असोत, शांततेत आंदोलन करा, जाळपोळ करू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community