Manoj Jarange: विशेष अधिवेशन घेऊन कायदा मंजूर करावा, मनोज जरांगेंची मागणी

173
Manoj Jarange: विशेष अधिवेशन घेऊन कायदा मंजूर करावा, मनोज जरांगेंची मागणी
Manoj Jarange: विशेष अधिवेशन घेऊन कायदा मंजूर करावा, मनोज जरांगेंची मागणी

पुण्यातील राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभा झाली. या सभेत जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन घेऊन कायदा मंजूर करण्याची मागणी केली आहे.

कायदा मंजूर करण्यासाठी सरकारला ५ हजार पुरावे दिलेत, असेदेखील जरांगे म्हणाले. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, याविषयी जरांगे माहिती देत असताना आरक्षणाच्या संदर्भातील पुढील दिशा मांडत असताना एका तरुणाने मंचावर येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सभा संपल्यानंतर त्या तरुणाशी चर्चा करणार, असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.

(हेही वाचा – World Health Organization : महिलांमध्ये लोहाच्या कमतरतेचे प्रमाण जास्त; जागतिक आरोग्य संघटनेचा दावा )

या सभेदरम्यान मनोज जरांगे यांनी गेल्या दीड महिन्यात १४ ते १५ मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. यापूर्वीदेखील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या. त्यांच्या कुटुंबाना मराठा समाज काही कमी पडू देणार नाही. मराठा समाजाचं दु:ख आणि वेदना सहन होत नाही त्यामुळे गावोगावी जाऊन मराठा माता-भगिनींचे आशीर्वाद घेत आहेत, असेही ते म्हणाले.

 मी शेतकऱ्याचा मुलगा असून शब्द दिला की त्यापासून मागं फिरत नाही. मराठा आरक्षणाचं आंदोलन शांततेच्या मार्गानं सुरु आहे. शांततेच्या मार्गानं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं हा शब्द आहे.माझ्या समाजाला आई बाप मानतो, समाजाशी गद्दारी करणार नाही. मी एकदा शब्द दिला की बदलत नाही. आपण मोर्चे खूप काढले, सभा घेतल्या पण घराघरातील लोकांनी आरक्षण समजून घेतलं नाही. मोर्चे काढले आणि सभा घेतल्या पण आरक्षण मिळालं नाही, अशी उद्गार जरांगे पाटील यांनी काढले.

कुणबी शब्दाचा सुधारित अर्थ…
आरक्षण समजून घेणं त्याच्या मुळाशी जाणं महत्त्वाचं होतं तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत, या मागणीसाठी आंदोलन सुरू झालं. आपण कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली आहे. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का, यावर काहीच उत्तर दिलं जात नाही, कुणबी शब्दाचा सुधारित अर्थ शेती असल्याची माहिती या अधिवेशनात मनोज जरांगे यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.