आज म्हणजेच २० फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. यावेळी मराठा समजाला दहा टक्के आरक्षणाचा मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार आता मराठा समाजाला (Manoj Jarange) शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण मंजूर झाले आहे. मात्र त्यांना ओबीसी आणि राजकीय आरक्षण नाकारण्यात आले आहे.
(हेही वाचा – Manoj Jarange : सगेसोयऱ्यांना आरक्षण न दिल्यास पश्चातापाची प्रचिती येईल)
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही –
ओबीसी मधून मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी होती. मात्र आता मराठा समाजाचे राजकीय आणि ओबीसी आरक्षण नाकारण्यात आले आहे. ओबीसी समाजाला सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण लागू आहे. मनोज जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गाचे फायदे मिळावेत, असे म्हणताना अप्रत्यक्षपणे राजकीय आरक्षणाची मागणी केली होती. परंतु, मराठा समाजाला (Manoj Jarange) राजकीय आरक्षण नसेल असं अहवालात नमूद करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण मंजूर)
याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “राज्य सरकार विशेष अधिवेशनात स्वतंत्र संवर्गातंर्गत मराठा समाजाला देऊ पाहत असलेला आरक्षण आम्हाला नको आहे. हे आरक्षण आमच्यावर लादले जात आहे. राज्य सरकारने आमची फसवणूक केली आहे.” असे मत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
राज्य सरकार आमच्या सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी कधी करणार? अधिसूचनेची अंमलबजावणी करायचीच नव्हती तर अधिवेशन कशाला घेतलं? राज्य सरकार विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातंर्गत आरक्षण देत आहे. हे आरक्षण आमच्यावर थोपवले जात आहे. आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवे, ही आमची मूळ मागणी आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. पण सरकार विशेष अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या (Manoj Jarange) अंमलबजावणीची चर्चा कशी करत नाही? सरकारने आम्हाला सांगितलं एक आणि आता ऐनवेळी दुसरं ताट समोर केले जात आहे. हे अजिबात चालणार नाही.
(हेही वाचा – Maratha Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण)
सरकारने आमची फसवणूक केली –
सगेसोयरेच्या आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी. नाहीतर उद्यापासून आम्ही आंदोलन सुरु करु, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. सरकारने आमची फसवणूक केली आहे, आणखी किती दिवस सरकार मराठा समाजाची फसवणूक करणार? तुम्ही अधिसूचना काढली, आता त्याची अंमलबजावणी नाही. मग अधिसूचना काढलीच कशाला?, असा सवाल मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विचारला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community