Manoj Jarange : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार… राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

मनोज जरांगे यांनी सरकारला तसेच विरोधकांना विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ओबीसीमधील काही जातींना कोणत्या निकषावर आरक्षण दिले आहे, हे जाहीर करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

94
Manoj Jarange : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार... राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
Manoj Jarange : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार... राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. (Manoj Jarange) त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या ३ दिवसांपासून ते अन्नपाण्याशिवाय तीव्र उपोषण करत आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती थोडीशी खालावल्याची माहिती आहे. असे असले तरी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास जरांगेंनी नकार दिला आहे. ‘आता माझ्यावर मराठा आरक्षण हेच उपचार आहे’, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. तपासणीसाठी गेलेल्या डॉक्टरांना त्यांनी तिसऱ्यांदा परत पाठवले आहे. (Manoj Jarange)

(हेही वाचा – Mukesh Ambani Death Threats : रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी )

मनोज जरांगे यांनी सरकारला तसेच विरोधकांना विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ओबीसीमधील काही जातींना कोणत्या निकषावर आरक्षण दिले आहे, हे जाहीर करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. आंतरवाली सराटी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, जरांगे मराठा आंदोलकांशी या बैठकीत चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Manoj Jarange)

‘राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी ४० दिवसांचा वेळ दिला होता. आरक्षणाची प्रक्रिया होणार नव्हती, तर सरकारने मुदत घेणे योग्य नव्हते. पुरावे मिळूनही सरकारची आरक्षण देण्याची इच्छा नाही. राज्य सरकारने न्यायमूर्ती शिंदे समितीला डिसेंबरपर्यंत दिलेली मुदतवाढ आम्हाला मान्य नाही. आणखी दहा वर्षे मुदत दिली तरी त्यांना वेळ कमीच पडणार आहे. आम्हाला समितीही मान्य नसून सरकारने वेळ मागून आमची फसवणूक केली’, असे मनोज जरांगे पाटील यांनी केली. (Manoj Jarange)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.