ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार (Manoj Kumar) यांचे दि. ४ एप्रिल रोजी निधन झाले आहे. मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी वयाच्या ८७ वर्षी मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात (Dhirubhai Ambani Hospital) अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटामुळे त्यांना एक वेगळी ओळखही मिळाली. आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या या अभिनेत्याने अभिनयासोबतही इतरही बऱ्याच क्षेत्रांमध्ये आपली ओळख निर्माण केली.
( हेही वाचा : Nagpur Crime : नागपूर हादरलं! भर बाजारात तरुणावर गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर)
आजही ‘मेरे देश की धरती’ (Mere desh ki dharti) या त्यांच्या गाण्याचे स्वर कानावर पडताच त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. मनोज कुमार यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. आजही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. २४ जुलै १९३७ रोजी हरियाणातील करनाल येथे त्यांचा जन्म झाला. ‘हरियाली और रास्ता’, ‘वो कौन थी’, ‘हिमालय की गोद में’, ‘दो बदन’, ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘नील कमल’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मनोज कुमार (Manoj Kumar) यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मनोज कुमार यांचा अल्पपरिचय
मनोज कुमार (Manoj Kumar) यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असे होते. चित्रपटसृष्टीच्या प्रेमासाठी त्यांनी आपल्या नावात बदल केला होता. पण त्यांना खरी ओळख ‘भारत कुमार’ या नावाने मिळाली. मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी एबटाबाद (आता पाकिस्तानमध्ये) या ठिकाणी झाला. हरिकिशन गिरी गोस्वामी (Harikishan Giri Goswami) यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात आले आणि दिल्लीत स्थायिक झाले. मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी फाळणीचे दुःख जवळून अनुभवले होते.
लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. अशोक कुमार, दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि कामिनी कौशल यांच्या चित्रपटांमुळे ते खूप प्रभावित झाले. यामुळे त्यांनी आपले हरिकिशन हे नाव बदलत मनोज कुमार असे केले. मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी कॉलेजच्या काळात अनेक नाटकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर ते मुंबईत आले. १९५७ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. १९६० मध्ये ‘कांच की गुड़िया’ या चित्रपटात ते पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘संन्यासी’ आणि ‘क्रांती’ यांसारख्या अनेक चित्रपटात ते झळकले. त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव ‘भारत’ असे असायचे. याच कारणामुळे चाहत्यांमध्ये ते ‘भारत कुमार’ म्हणून लोकप्रिय झाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community