Manoj Saunik यांनी महारेरा अध्यक्षपदाचा स्वीकारला कार्यभार 

49
Manoj Saunik यांनी महारेरा अध्यक्षपदाचा स्वीकारला कार्यभार 
Manoj Saunik यांनी महारेरा अध्यक्षपदाचा स्वीकारला कार्यभार 

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात महारेराच्या अध्यक्षपदाची (Maharera President) सूत्रे राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी शुक्रवारी स्वीकारले. तत्पूर्वी, शुक्रवारी मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांनी सौनिक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, महारेराचे सदस्य महेश पाठक, महारेरा अपिलीय प्राधिकरणाचे सदस्य एस. एस. संधू, महारेरा माजी अध्यक्ष अजय मेहता (Ajay Mehta) तसेच गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. (Manoj Saunik)

(हेही पाहा – Crime : बेस्ट वाहकावर चाकू हल्ला करणाऱ्याला १२ तासांत केली अटक)

राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी म्हणजे जुलै महिन्यात मनोज सौनिक (Manoj Saunik) यांच्या महारेरावरील नियुक्तीचा आदेश काढला होता. त्यानुसार महारेराचे मावळते अध्यक्ष अजय मेहता (Ajay Mehta) यांच्याकडून सौनिक यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. सौनिक हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९८७ च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. ३० एप्रिल २०२३ रोजी त्यांनी राज्याचे मुख्य सचिव म्हणून सूत्रे स्वीकारली होती. आठ महिन्यानंतर म्हणजे ३१ मार्च २०२३ रोजी सौनिक हे मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर सौनिक यांची वर्णी मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून लागली होती. (Manoj Saunik)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.