मनोरमा साहित्य पुरस्काराचे ‘हे’ आहेत मानकरी

130

मनोरमा सोशल फाऊंडेशन संचलित, मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर आयोजित मनोरमा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा २०२१चे वितरण २६ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी दिली.

यंदाच्या वर्षीचा मनोरमा बँक साहित्य महर्षी जीवनगौरव पुरस्कार २०२१ हा जेष्ठ साहित्यिक, पंढरपूर डॉ. द.ता. भोसले यांना मनोरमा बँक अमृत वक्ता पुरस्कार २०२१ विवेक घळसासी यांना देण्यात आला आहे. जेष्ठ निरुपणकार, सोलापूर, मनोरमा बँक साहित्य पुरस्कार २०२१ साखर आयुक्त डॉ. शेखर गायकवाड, पुणे समग्र साहित्य, मनोरमा साहित्य पुरस्कार २०२१ – डॉ. सुहास पुजारी, सोलापूर, शशिकांत लावणीस, सोलापूर, मनोरमा मल्टीस्टेट पुरस्कृत मनोरमा साहित्य पुरस्कार २०२१, वंदना कुलकर्णी, सोलापूर, विष्णु पावले, सांगली, कै. नागेशराव सुरवसे साहित्य पत्रकार पुरस्कार २०२१ रेणुका बुधाराम, सोलापूर, दा. गो. काळे, शेगाव आणि स. रा. मोरे ग्रंथालया तर्फे मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार २०२१  प्रतापसिंह चव्हाण, रत्नागिरी, हेमकिरण पत्की, सोलापूर यांना जाहीर झाला आहे.

(हेही वाचा 2014 साली हिंदूत्ववादी शिवसेनेला कोणी दूर केले? संजय राऊतांचा अमित शहांवर पलटवार)

पुरस्कार वितरण सोहळा सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते

सदर पुरस्कार वितरण सोहळा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती सारथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी, जेष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले, महाराष्ट्र राज्य साखर आयुक्त डॉ. शेखर गायकवाड, पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे, प्रमुख कार्यवाह मसाप पुणे प्रकाश पायगुडे यांच्या उपस्थितीमध्ये रविवार, २६ डिसेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता शिवछत्रपती रंगभवन, रंगभवन चौक, सोलापूर येथे होणार असल्याची माहिती मनोरमा साहित्य मंडळी तथा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा मनोरमा पश्चिम सोलापूर चे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी दिली.

यावेळी मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे, मनोरमा साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. राजशेखर शिंदे, मनोरमा बँकेचे संचालक संतोष सुरवसे, उज्वला साळुंखे, सुहास भोसले, रघुनाथ डोके, पुरस्कार निवड समिती सदस्य प्रा. माधव कुलकर्णी, राजेंद्र भोसले, मनोरमा बँक सिईओ शिल्पा कुलकर्णी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. सदर पुरस्कार सोहळा कोविड-१९ च्या सर्व नियमाचे (मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स व दोन डोस घेतलेल्या व्यक्ती) पालन करून करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.