मंत्रालयात (Mantralaya) एका व्यक्तीने संरक्षक जाळीवर उडी घेतल्याची घटना गुरुवारी (६ जून) दुपारी घडली. या घटनेनंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली. यामुळे पोलिसांची एक पळापळ झाली. पोलिसांनी तातडीने आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. संरक्षक जाळीवर उडी घेणाऱ्या व्यक्तीविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. (Mantralaya)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पुन्हा एकदा मंत्रालयात (Mantralaya) एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. एका व्यक्तीने मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी घेतली. उडी मारलेली व्यक्ती सुरक्षित आहेत. या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही, अशी माहिती मिळत आहे. (Mantralaya)
(हेही वाचा – रशियातील St. Petersburg Assembly आणि Maharashtra Legislature सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या)
या व्यक्तीने संरक्षक जाळीवर उडी मारल्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. मंत्रालयातील (Mantralaya) दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त केले. सदर व्यक्तीच्या हातात एक बाटली होती आणि त्यात विष असल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. (Mantralaya)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community