विदर्भात उन्हाचा तडाखा! राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ३५ अंशापुढे

85

फेब्रुवारीच्या सुरूवातीला थंडी पडल्यानंतर आता राज्यातील अनेक भागात तापमान वाढले आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे.

( हेही वाचा : अडीच दिवस कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शेवटच्या क्षणी झाले भावूक अन् म्हणाले…)

अकोल्यामध्ये ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून गेल्या दहा वर्षातील अकोल्यात फेब्रुवारी महिन्यातील कमान तापमानाचा हा उच्चांक आहे. नागपुरातसुद्धा पारा ३८ अंशावर पोहोचला आहे. अकोला आणि नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या कमाल तापमान सामन्यापेक्षा ३ ते ४ अंश जास्त आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये वाशिममध्ये ३८ अंश तर वर्धा, नागपूर, सोलापूर, यवतमाळ आणि नांदेड येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ३५ अंशापुढे

सांगली 36.3
कोल्हापूर 35.6°c
जालना 35.8
नाशिक 35.5
औरंगाबाद 35.4
पुणे 35.7
सातारा 35.8
उद्गीर 35.8
सोलापूर 37
परभणी 36.1
जेऊर 36
ओसबाड 36
नांदेड 37.2
जळगाव 36.6
अकोला 38.5
अमरावती 36.4
चंद्रपूर 36.4
यवतमाळ 36.2

उन्हाळ्यात काय काळजी घ्याल?

  • पाण्याची बाटली जवळ ठेवा
  • उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या, मऊ, कॉटनचे कपडे वापरा.
  • आहारात फळे, ताक, लिंबू पाणी, ज्यूस, सरबत, दही याचा समावेश करा.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.