Railway : लांब पल्ल्याच्या गाड्या का धावतायेत उशिराने, काय आहे नेमके कारण

गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असून दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीला सतत फटका बसत आहे.

274
Railway : लांब पल्ल्याच्या गाड्या का धावतायेत उशिराने, काय आहे नेमके कारण
Railway : लांब पल्ल्याच्या गाड्या का धावतायेत उशिराने, काय आहे नेमके कारण

दाट धुक्यामुळे सोलापूर -मुंबई वंदे भारत ट्रेनसह अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या आपल्या दिलेल्या वेळेत उशिराने धावत असल्याने त्यांच्या परिणाम उपनगरीय लोकल सेवावर शुक्रवारी (८ डिसेंबर) दिसून आला. त्यामुळे मेल-एक्सप्रेसच्या प्रवाशांसह उपनगरीय प्रवाशांचे हाल झाले. तर धुक्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडत असल्याचे रेल्वे चे म्हणणे आहे. (Railway)

गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असून दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीला सतत फटका बसत आहे. खंडाळा आणि कसारा घाटातील धुक्यामुळे सकाळी मुंबईला येणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावत होत्या. त्यातच पुणे आणि सोलापूर दरम्यान असलेल्या दौंड सेक्शनमध्ये पहाटेपासून प्रचंड धुक्यामुळे सकाळी ६ वाजता सोलापुरहून निघालेली सोलापूर-मुंबई वंदे भारत ट्रेन सीएसएमटी स्थानकावर तब्बल दोन तास उशिराने पोहचली. याशिवाय होसपेट एक्स्प्रेस, हैद्राबाद हुसेन सागर, एलटिटी-कोईमतूर एक्स्प्रेस,दादर-हुबळी एक्स्प्रेस,महालक्ष्मी एक्स्प्रेस उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. (Railway)

(हेही वाचा :NIA Raid : एनआयए ची मोठी कारवाई, ४४ ठिकाणी छापेमारी, १३ संशयित ताब्यात)

तर या गाड्या उपनगरीय लोकल मार्गावर वळविण्यात आल्याने अप जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला. त्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर परिणाम झाला. या धुक्यामुळे मोटरमनला पाच फुटाच्या पलीकडील काही दिसत नसल्याने दिव्यांच्या प्रखर झोतात मोटारमन हळूहळू लोकल पुढे नेतात. अशा धुक्यात लोकल वेगाने चालविली तर अपघाताची शक्यता असते. धुक्याची चादर तयार झाली की मोटरमन हळूहळू लोकल चालवितात. आणि धुके असताना गाडीचा वेग कमी करा अशा सूचना आम्ही दिल्या असल्याचे असेही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.