मुंबईतील गायब असलेले आयकर थकबाकीदार चाळीत राहणारे; सेबीचा खुलासा

आयकर विभागाला आयकर थकबाकीदारांकडून आयकर वसूल करणे हे आव्हान असते. त्यासाठी आयकर थकवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई प्रसंगी मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाते. पण अशी कारवाई मुंबईतील अनेक आयकर थकबाकीदारांवर करणे सेबी (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) ला शक्य होत नाही.
२०१४ सालापासून कित्येकांनी आयकर थकवला आहे. पण ते सेबीला सापडतच नाहीत. त्यामुळे त्यांना ‘मिसिंग’ घोषित केले आहे. हे सगळे मुंबईत पडीक आणि गांजलेल्या चाळींमध्ये राहणारे आहेत, अशी माहिती सेबीने दिली आहे.

९ थकबाकीदारांची यादी जाहीर 

SEBI ने ‘अनट्रेसेबल डिफॉल्टर्स’ ची काळी-सूची प्रकाशित केली आहे, जे २०१४ पासून बेपत्ता आहेत. त्यात एकूण ९ थकबाकीदार आहेत. ते गेल्या ८ महिन्यांपासून ते ८ वर्षांपर्यंत गायब आहेत. त्यांचे अनेक निवासी पत्ते आहेत. त्यांचा शेवटचा पत्ता जोवर उपलब्ध होत नाही, तोवर त्यांना सेबीला नोटीस देता येणार नाही. या थकबाकीदारांची कुणाला माहिती मिळाल्यास त्यांनी ताबडतोब कळवावे असे सेबीने सर्वसामान्य नागरीकांना केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here