राज्यात पावसाचा हाहाकार; वाहतूक ठप्प, अनेक मार्ग बंद!

राज्यभरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे सातारा जिल्ह्यातील वीर धरण १०० टक्के भरले आहे तर पैनगंगा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे राज्यातील अनेक मार्ग बंद झाले असून काही भागांचा संपर्क तुटला आहे.

( हेही वाचा : बेस्टच्या कंडक्टरला मारहाण करणाऱ्या प्रवाशाला सहा महिन्यांची शिक्षा )

कोल्हापूर – रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद

कोकणात रविवारपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. याआधी गगनबावडा रस्ता मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आला होता. यानंतर आता रत्नागिरीत जाणारा दुसरा रस्ता सुद्धा बंद केल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

वर्धा जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद

नदी, नाल्यांना पूर आल्याने वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील माणिकवाडा रस्ता बंद झाल्याने येथील सहा गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे.

महाराष्ट्र – तेलंगणा संपर्क तुटला

महाराष्ट्र-तेलंगणावरील पोडसा पूल पाण्याखाली गेल्यामुळे महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचा संपर्क तुटला आहे. तर चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा आष्टी पूल सुद्धा पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here