मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या १६ दिवसांपासून उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील हे अजूनही आपल्या उपोषणावर ठाम आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा नवीन GR निघेपर्यंत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. जोपर्यंत सर्वसामान्य मराठा जनतेच्या (Maratha Reservation) हातात आरक्षणाचं पत्र पडत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. तुम्हाला विचारल्याशिवाय मी कोणतंही पाऊल उचलणार नाही. मी तुमच्यापुढे जाणार नाही. मी तुमच्यासाठी जीवाची बाजी लावणार आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
अशातच मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) यांच्याशी ४० मिनीटं चर्चा झाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाशी बंद दाराआड चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाली असून, सकाळी मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्यावर समाधानी आहे की नाही हे कळेल. आज दिवसभर त्यांची वाट पाहू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
(हेही वाचा – Innovative Technology : नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरा….! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश…)
चर्चा समाधानकारक, सरकार आरक्षणाबाबत गंभीर : रावसाहेब दानवे
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री गिरीश महाजन हे उपोषणस्थळी अंतरवाली सराटी गावात दाखल झाले होते. मध्यरात्री (Maratha Reservation) त्यांनी जरांगे पाटलांसह त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा १७ वा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं. मी आणि आमच्या राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे यांच्या टीमसोबत चर्चा केली आहे. चर्चा समाधानकारक झाली. सरकार अरक्षणाबाबत गंभीर आहे. आजच्या चर्चेनंतर जे मुद्दे समोर आले त्या मुद्द्यांवर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे रावसाहेब दानवे म्हणाले. मी दिल्लीवरुन आलो, गिरीश महाजन मुंबईवरुन आल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community