Dharashiv curfew : आंदोलक आक्रमक : बीडनंतर आता धाराशिवमध्ये संचारबंदी

117
Dharashiv curfew : आंदोलक आक्रमक : बीडनंतर आता धाराशिवमध्ये संचारबंदी

गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षण (Maratha Reservation) या मुद्द्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. आज म्हजेच मंगळवार ३१ ऑक्टोबर हा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. तर दुसरीकडे संपूर्ण राज्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी अनेक गाड्यांचे नुकसान केले आहे. (Dharashiv curfew)

अशातच आता धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणाला (Dharashiv curfew) हिंसक वळण आलं आहे. एसटी बसेसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेमुळे धाराशिव जिल्हा हादरला आहे.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता (Dharashiv curfew) जिल्हाधिकाऱ्यांनी आज (३१ ऑक्टोबर) जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी आदेश जारी केले आहे.

(हेही वाचा – Mukesh Ambani Threat Case : उद्योगपती मुकेश अंबानी यांना तिसरा धमकीचा ईमेल, खंडणीची रक्कम ४०० कोटी)

शासकीय / निमशासकीय कार्यालये, दूध वितरण, पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थापना, सर्व बँका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा-या आस्थापना, आणि रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था यांना या संचारबंदीमधून सुट देण्यात आली आहे. (Dharashiv curfew)

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यात (Dharashiv curfew) पुढील आदेश मिळेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे आदेश शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, दुकाने, आस्थापना यांनाही लागू राहतील. या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.