मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याशी मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून संवाद साधला. (Maratha Reservation) उपोषण करू नका, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. ‘समितीचा अभ्यास सुरू असून आरक्षण लवकरच मिळेल, काहीतरी सकारात्मक होईल, साखळी ठेवा; मात्र आमरण उपोषण नका करू’, असे म्हणत गिरीश महाजन यांच्याकडून जरांगेना विनवणी करण्यात आली. (Maratha Reservation)
(हेही वाचा – Manoj Jarange Patil : …त्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवत आहे; जरांगे पाटील यांचा आरोप)
त्यावर जरांगे पाटील यांनीही उत्तर दिले आहे. तुम्ही एक महिना मुदत मागितली. तुमच्या शब्दाला मान देत आम्ही एक महिन्याऐवजी 41 दिवस दिले, आता अडचण काय आहे ? आमचे काय चुकले ? समितीचा अभ्यास 40 वर्षांपासून सुरूच आहे, मराठा आंदोलकांवरील खटले दोन दिवसात मागे घेतो, ते अजून मागे घेतलेले नाहीत, असे उत्तर जरांगे यांनी महाजन यांना दिले आहे. (Maratha Reservation)
आतापर्यंत 15 -16 जणांनी आत्महत्या केल्या. त्याबद्दलही सरकारला काही सहानभूती नाही. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्या, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर – गिरीश महाजन
तुम्ही उपोषण मागे घ्या, आपण मार्ग काढू, मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर आहे. आम्हाला असे आरक्षण द्यायचे आहे, त्याला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. न्यायालयात आव्हान देता येणार नाही. त्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.
जरांगे पाटील यांनी उचलला नाही महाजन यांचा फोन
या वेळी जरांगे पाटलांना विचारण्यात आले की, तुम्ही सकाळी गिरीश महाजनांचा फोन का उचलला नाही ? त्यावर मनोज जरांगे म्हणाले, त्यांच्याकडे आरक्षणाबाबतचे पत्र नसणार. शासनाने काढलेला जीआर (अधिसूचना) तर नसणारच. त्यावेळी माझा फोन मित्राकडे होता. मी लोकांमध्ये होतो. नंतर मित्राने सांगितल्यावर मी परत गिरीश महाजन यांना फोन केला. त्यांनी उचलला नाही, त्यांच्याकडून परत फोन आलाही नाही.मनोज जरांगे म्हणाले, मंगळवारी दिवसभर मी कार्यक्रमातच होतो. त्यांच्याकडे (महाजन) काय असणार आहे ? शासनाने अधिसूचना काढली म्हणून ते सांगणार आहेत का ? कायदा पारित झाला म्हणून सांगणार आहेत का ? तसं असेल तर सांगा, लगेच फोन उचलतो किंवा त्यांना फोन करतो. (Maratha Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community