Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी उचलले मोठे पाऊल

164
Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी उचलले मोठे पाऊल
Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी उचलले मोठे पाऊल

मराठा आरक्षणाला गेल्या काही दिवसांत हिंसक वळण लागले आहे. (Maratha Reservation) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि जाळपोळ या मुद्यावर चर्चा झाली आहे. या पार्श्वभूमीवर वकील तथा एसटी संघटनेचे नेते गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालायात मराठा आंदोलनाविरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे त्यांनी मराठा आंदोलनातील हिंसक घटनांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Maratha Reservation)

गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या वकीलामार्फत याचिका करतांना म्हटले आहे की,  मराठा आंदोलकांकडून ज्या पद्धतीने आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहे. त्यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलेले असून यात उच्च न्यायालयाने हस्तक्षेप घ्यावा, व हिंसक आंदोलकांविरूद्ध कारवाई केली जावी. (Maratha Reservation)

(हेही वाचा – V V S Laxman Birthday : पाहूया व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणच्या ४९व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन)

या प्रकरणी आता 8 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

आधीच झाली आहे गाड्यांची तोडफोड

‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत तिघांनी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या टोयोटा वेलफायर आणि टोयोटा फॉर्च्यूनर या दोन गाड्यांची तोडफोड केली होती. परळ येथील सदावर्ते राहत असलेल्या टॉवरखाली पार्क केलेल्या या गाड्यांना लक्ष्य करणाऱ्या मंगेश साबळे, वसंत बनसोड आणि राजू साठे या तिघांना भोईवाडा पोलिसांनी जागीच पकडले.

तिघांनाही अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना जामिनावर सोडण्यात आले. मंगेश साबळे हा संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचा सरपंच आहे.  वसंत आणि राजू हे देखील त्याच गावचे असून शेतीकाम करतात. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.