Maratha Reservation : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा; मराठा आरक्षणाला ‘असे’ दिले समर्थन

Hemant Patil Resignation : 'मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा द्या', अशी मागणी आंदोलकांनी केल्यानंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपला राजीनामा लिहून दिला.

147
Maratha Reservation : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा; मराठा आरक्षणाला 'असे' दिले समर्थन
Maratha Reservation : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा; मराठा आरक्षणाला 'असे' दिले समर्थन

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राजीनामा दिला आहे. (Maratha Reservation) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी भेट घेतली. त्या वेळी आंदोलकांनी ‘मराठा आरक्षणाला समर्थन देण्यासाठी खासदारकीचा राजीनामा द्या’ अशी मागणी केली. त्यानंतर हेमंत पाटील यांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून आंदोलकांना दिला. हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले आहेत. सध्या ते शिंदे गटात आहेत. मराठा आरक्षणासाठी एखाद्या आमदार वा खासदाराने दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे. राजीनामा देण्यासह हेमंत पाटील यांनी उपोषणाचीही घोषणा केली आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि जरांगे यांच्या तब्येत काही झाले नाही पाहिजे’, असे आंदोलकांनी हेमंत पाटील यांना सांगितले. दोन दिवसांनी मी स्वतः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत उपोषणाला बसणार आहे, असे हेमंत पाटील यांनी सांगितले. (Maratha Reservation)

(हेही वाचा – India vs England : भारताची भिस्त आता गोलंदाजांवर; इंग्लंडसमोर २३० धावांचे आव्हान )

यवतमाळच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना येथे खासदार पाटील आले होते. त्यांचा ताफा शनिवार, २९ ऑक्टोबर रोजी हदगावमध्ये अडवण्यात आला. या वेळी आमदार खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होत मराठा आंदोलकांनी खासदार हेमंत पाटील यांना घेराव घातला. मराठा आरक्षणप्रश्नी मी दिल्ली येथे खासदारांची बैठक बोलविली; मात्र मराठा बांधवांची मागणी असेल, तर एक मिनिटात राजीनामा देतो, असे खासदार पाटील यांनी या वेळी सांगितले. आणि लोकसभा अध्यक्षांच्या नावे राजीनामा लिहिला. (Maratha Reservation)

महाराष्ट्रात मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना तीव्र असून मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतक-यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनाला माझा पाठिंबा असून, आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.