राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला (Maratha Reservation) हिंसक वळण आले आहे. आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी अनेक ठिकाणी एसटी बसेसची जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी आमदारांच्या घरावर दगडफेक करण्यात आली, तर काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवण्यात आला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था (Maratha Reservation) अबाधित राहावी. समाजमाध्यामावरून अफवा थांबव्यात यासाठी आगामी ४८ तास ग्रामीण भागांत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचा – Naresh Goyal : जेट एअरवेजच्या मालकाची 538 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त)
जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी जिल्ह्यात (Maratha Reservation) पाचपेक्षा अधिक व्यक्तींना जमण्यासाठी किंवा सभा, मिरवणूक, मोर्चा, ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना असतील असे सांगितले आहे.
हे आदेश १५ नोव्हेंबरपर्यंत लागू असतील. तसेच या आदेशाद्वारे जिल्ह्यात शस्त्र बाळगणे, विनापरवानगी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही जनार्दन विधाते यांनी स्पष्ट केले आहे. (Maratha Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community