Maratha Reservation : मुंबईकडे निघालेले जरांगे पुन्हा अंतरवालीत दाखल; आंदोलकांना म्हणू लागले ‘घरी जा’

मनोज जरांगे-पाटलांबरोबचे मराठा आंदोलक शैलेंद्र पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी जालना जिल्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी तेथे राज्य परिवहन महामंडळाची बस जाळली.

516
Maratha Reservation : मुंबईकडे निघालेले जरांगे पुन्हा अंतरवालीत दाखल; आंदोलकांना म्हणू लागले 'घरी जा'

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर रविवारी (२५ फेब्रुवारी) दुपारी मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा सामाजाचे (Maratha Reservation) आंदोलक आता पुन्हा अंतरवालीत दाखल झाले आहेत. स्वतः जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलकांना घरी जाण्यास सांगितले आहे. पोलिसांकडून अंतरवालीत जमावबंदी लागू केल्याने जरांगे पाटील अंतरवालीत दाखल झाले आहेत.

(हेही वाचा – Veer Savarkar : रणछोडदासाची नव्हे तर नृसिंहाची पूजा आवश्यक!)

नेमकं प्रकरण काय ?

अंतरवाली सराटी येथे रविवारी समाजातील सदस्यांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटलांनी (Maratha Reservation) फडणवीसांना माझा बळी हवा आहे असं म्हणत आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं. तसेच संतापलेल्या जरांगे-पाटलांनी थेट मुंबईमधील फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर आपण जाणार असल्याचं म्हटलं. भाषण संपता संपता अस्वस्थ झालेले जरांगे पाटील आंदोलनाच्या ठिकाणावरुन उठून चालू लागले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न अनेक सहकाऱ्यांनी केला मात्र जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम असून त्यांनी आपला प्रवास सुरुच ठेवला. रविवारी रात्रीचा मुक्काम जरांगे-पाटील यांनी भांबेरी गावात केला.

(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आंदोलकांकडून जाळपोळ; कारवाईला विरोध करत आंदोलकांनी जाळली एसटी)

मराठा आंदोलक आक्रमक :

दरम्यान मनोज जरांगे-पाटलांबरोबचे (Maratha Reservation) मराठा आंदोलक शैलेंद्र पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी जालना जिल्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी तेथे राज्य परिवहन महामंडळाची बस जाळली.

(हेही वाचा – कामगार चळवळीत सामील पत्रकार आणि राजकीय नेते पद्मश्री B. Shiva Rao)

संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू :

या घटनेनंतर पोलिसांकडून संपूर्ण जालना जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने भांबेरी गावाबरोबरच संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. लवकरच पुढची दिशा ठरवू असे जरांगे यांनी सांगितले आहे. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.