राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) जो जी आर जाहीर केला आहे. त्यात काही थोडी दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी ( ९ सप्टेंबर) रोजी केले. आणि ही दुरुस्ती केल्यावरच मी पाणी पिणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील (manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केला.त्यांच्या आंदोलनाचा बारावा दिवस सुरु आहे. सरकारचा निरोप घेऊन आमदार अर्जुन खोतकर यांनी बंद लिफाफ्यातून सरकारचा जीआर जरांगे यांना दिला. मात्र, त्यातूनही गेल्या बारा दिवसांपासून आंतरवाली सराटी येथे सुरू असलेले हे उपोषण अजुन सुरूच आहे.
दुसरीकडे जरांगे-पाटील यांंच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला वेळ हवा आहे. तो त्यांनी द्यावा, अशी मागणी यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी केली. त्यावर जरांगे यांनी काय वेळ घ्यायचा तो घ्या, मात्र आमच्या मागण्या मान्य करा, असे उत्तर दिले. राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा न्यायालयात टीकला पाहिजे, त्यासाठी विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे, राज्य सरकारचे मत आहे. राज्य सरकारने घेतलेला निर्णय मनोज जरांगे पाटील यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील आपल्या सहकाऱ्यांची चर्चा करून आपल्या उपोषणाबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचा : G-20 Summit : जी-२० मध्ये पंतप्रधान मोदींसमोर आहे ‘भारत’ नावाची नेमप्लेट)
आंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचा आज बारावा दिवस आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर उपोषण सोडावे, अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
सरकारच्या जीआरमध्ये किरकोळ दुरुस्ती राहिली आहे. त्यांना वेळ देऊ. ही दुरुस्ती होईल. महाराष्ट्राला न्याय मिळेल, मनोज जरांगे यांचा आशावाद.मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अजून काही अवधी लागेल. तो त्यांनी द्यावा, अर्जुन खोतकर यांची मागणी. माझ्या शब्दापुढे जाऊ नका. शांततेत आंदोलन करा. आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, जरांगे पाटील यांचा निर्धार. द्वेष करायचा नाही. चर्चेशिवाय आपल्याला पर्याय नाही. मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन. मराठा आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे अजून मागे घेतले नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली नाही.२००४ च्या जीआरचा आम्हाला काही फायदा झाला नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे,असेही जरांगे म्हणाले, वंशावळी असलेल्यांना नको, तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community