
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारने एक दिवसीय विशेष अधिवेशनही (special session of legislature) बोलवले आहे. या वेळी मराठा आरक्षणावरून न्यायालयीन लढा देणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे. (Maratha Reservation)
(हेही वाचा – Anu Kapoor: बहुरंगी आणि बहुगुणी कलाकार !)
मनोज जरांगे यांचा मोर्चाचा स्टंट
गुणरत्न सदावर्ते या वेळी म्हणाले की, कोणीतरी जरांगे उपोषणाचे ढोंग करत आहे. ट्रॅक्टर असूनही ट्रॅक्टर नसल्याचे सांगितले जात आहे. घर असूनही ते नसल्याचे सांगितले जात आहे. अंगठे बहाद्दर माणसांकडून सर्वेक्षण केले. मनोज जरांगे यांचा मोर्चाचा स्टंट होता. मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना बुमरँग केले. मनोज जरांगेंच्या हिशोबाने कायदा करणे चुकीचे आहे; कारण जरांगे म्हणजे कायदा नाही, अशा शब्दांत सदावर्ते यांनी संताप व्यक्त केला आहे.
मराठा समाजाला मागास ठरवण्याचा घाट
आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाचा हा दिवस असेल. मराठा समाजाला मागास ठरवण्याचा घाट घातला जात आहे. कायदा तयार करण्याची संहिता आपण विसरलो का ? ५० टक्के खुल्या प्रवर्गासाठी ठेवलेल्या जागेतून आरक्षण देता, इतरांना फक्त ३७ टक्के जागा उरणार. ओबीसींच्या बाबतीत कुणबीकरण केले जाऊ शकत नाही. सगेसोयरे कायदा करता येणार नाही. सरकारने कायदा केला, तर परिणाम भोगायला तयार राहावे, असा इशारा देऊन ‘विशेष अधिवेशनात सरकारने कायदा आणला, तर काही तासांत न्यायालयात कायद्याला चॅलेंज करणार’, असे आव्हान गुणरत्न सदावर्ते यांनी दिले आहे. (Maratha Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community