Maratha Reservation : मनोज जरांगे लोणावळ्याच्या दिशेने रवाना; वाकसई फाटा येथे होणार जाहीर सभा

151
Maratha Reservation : मनोज जरांगे यांचा आज लोणावळ्यात मुक्काम -प्रशासकीय यंत्रणा सज्ज
Maratha Reservation : मनोज जरांगे यांचा आज लोणावळ्यात मुक्काम -प्रशासकीय यंत्रणा सज्ज

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मराठा मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे. (Maratha Reservation) बुधवार, 24 जानेवारी रोजी लोणावळा शहराजवळील वाकसई फाटा येथे जाहीर सभेचे नियोजन आहे. याच ठिकाणी मनोज जरांगे यांचा मुक्काम देखील होणार आहे.

(हेही वाचा – Nagar-Kalyan Highway Accident : नगर-कल्याण मार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू)

पोलिसांनी केली पहाणी

मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी या सभेच्या ठिकाणाला भेट देत जागेची पाहणी केली. तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती घेतली.

मनोज जरांगे यांच्या सभेसाठी पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले आहेत. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे पाटील या पोलीस अधिकाऱ्यांनी सभास्थळी पाहणी केली.

(हेही वाचा – MLA Rohit Pawar: रोहित पवार ईडी कार्यालयाकडे रवाना, बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहारप्रकरणी चौकशी)

वाहतुकीत बदल

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची पदयात्रा राष्ट्रीय महामार्ग ४८ ने लोणावळ्याला पोहोचणार आहे, तर गुरुवारी सकाळी लोणावळा येथून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून (Mumbai-Pune Expressway) पुढे वाशीला जाणार आहे. मुंबई-पुणे वाहिनीवरील साखळी क्रमांक किमी ५४/४००, पुणे-मुंबई वाहिनीवर साखळी क्रमांक किमी ५३/०००,किमी ५०/०००, किमी ४८/००, खंडाळा उतारावर किमी ४६/२०० खंडाळा बोगदा येथील दुभाजक कट लोखंडी वा सिमेंटचे बॅरीगेट्स लावून तात्पुरते बंद करण्यात येणार आहे. द्रुतगती महामार्गावरून पदयात्रा पुढे जाईपर्यंत गुरुवारी सकाळपासून पुण्याहून मुंबईच्या (Mumbai) दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात येणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.