बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७व्या गळित हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज, शनिवारी होणार होता. (Maratha Reservation) मात्र, मराठा क्रांती मोर्चाने पवार यांना कारखान्यात येण्यास विरोध केला असून, आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ‘मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कारखान्यात कोणतेही कार्यक्रम पवार यांच्या हस्ते घेऊ नयेत’, अशा मागणीचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांना देण्यात आले आहे. (Maratha Reservation)
(हेही वाचा – Paris Olympic Qualification : नेमबाज अर्जुन आणि तिलोत्तमा यांची ऑलिम्पिक वारी निश्चित)
त्याच पार्श्वभूमीवर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमले आहेत. कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनीही शुभारंभाला जाणे टाळले आहे.
आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेली युवा संघर्ष यात्राही तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. ‘मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण अस्वस्थ झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शांतता धोक्यात येऊ नये, यासाठी यात्रा स्थगित करत आहे’, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. नांदेड जिल्ह्यातही राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी असतांना गुरुवारी रात्री एका आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी गेलेले खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. (Maratha Reservation)
नाशिक जिल्ह्यात ५५० गावांत प्रवेशबंदी
नाशिक जिल्ह्यातील ५५० गावांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे फलकही संबंधित गावांच्या प्रवेशद्वारावर लावण्यात येत असल्याची माहिती सकल मराठा समाजाने दिली आहे.
अंबादास दानवे यांना दाखवले काळे झेंडे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले; तसेच घोषणाबाजी केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध पातळ्यांवर राज्यभरात सुरू असलेले आंदोलन आणि राजकीय नेत्यांविरोधातील संताप तीव्र होत आहे. राज्यभरच गावबंदीचे फलक झळकू लागले आहेत. (Maratha Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community