मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील आंदोलन आक्रमक झाले आहेत. (Maratha Reservation) माजलगाव येथे आमदार प्रदीप सोळुंके यांचे घर पेटवून दिल्यानंतर जमावाने माजलगाव नगर परिषदेमध्ये जाळपोळ केली. आरक्षणाची मागणी करत आलेल्या जमावाने माजलगाव नगर परिषदेमध्ये घुसून जाळपोळ केली. त्यामुळे नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये मोठी आग लागली आहे. (Maratha Reservation)
(हेही वाचा – Ind vs Eng : विराटला ट्रोल करणाऱ्या इंग्लिश संघाच्या ट्विटर हँडललाच विराटच्या चाहत्यांनी केलं ट्रोल)
सध्या घटनास्थळी मोठी आग पाहायला मिळत आहे. तसेच परिसरात धुराचे लोट दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या माजलगाव परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाने आता उग्ररूप घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Maratha Reservation)
बीड जिल्ह्यामध्ये परळी-बीड त्यासोबतच धुळे-सोलापूर आणि त्यानंतर आता कल्याण विशाखापटणम् महामार्गावरही आंदोलन करत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चौकांमध्ये रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Maratha Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community