गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षण (Maratha Reservation) या मुद्द्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. आज म्हजेच सोमवार ३० ऑक्टोबर हा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. तर दुसरीकडे संपूर्ण राज्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी अनेक गाड्यांचे नुकसान केले आहे.
अशातच आता अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी दगडफेक केली. आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. त्यांनतर आंदोलकांनी बंगल्यात प्रवेश करत पार्किंगमधील गाड्यांचीही तोडफोड केली.
(हेही वाचा – Maratha Reservation : सरकारला एखादा बळी घ्यायचा असेल, तर घेऊ द्या; मनोज जरांगे भूमिकेवर ठाम)
काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील (Maratha Reservation) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे (MLA Prakash Solanke) आमदार प्रकाश सोळंके यांची क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी आमदार सोळंके यांच्या घरावर हल्ला केला. जवळपास एक तास ही दगडफेक आणि जाळपोळ सुरु होती.
या सर्व प्रकारावर भाष्य करतांना आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) म्हणाले की, “मी माजलगावमध्येच आहे. मी घरातच आहे. आज (३० ऑक्टोबर) सकाळी अचानक काही आंदोलक माझ्या घरी आले. माझ्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. घराचं, ऑफिसचं आणि गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. मी सर्व आंदोलकांना विनंती करणार आहे की, मी मराठा समाजाचाच आमदार आहे आणि माझाही मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. आरक्षण मिळावं अशी माझीही मागणी आहे. काही राजकीय विरोधक असतात जे काही बाबतीत चिथावणी करु शकतात. माझा कोणत्याही आंदोलकांवर राग नाही, मी त्यांच्या भावना समजू शकतो सध्या त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे अशा बाबतीत राजकीय विरोधक संधी घेतात, असाच प्रकार याबाबतीत झाला असल्याचं मला वाटतं.” (Maratha Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community