लोकसभा निवडणुकीवेळी (Lok Sabha Elections 2024) ‘संविधान बदलणार’ असे जे फेक नरेटिव्ह सेट करण्यात आले होते. त्यावर मी बैठकीत मार्गदर्शन केले. बैठकीत जे काही बोलले गेले असेल, तो अंतर्गत विषय आहे. भाजपाचे सरकार आले. भाजपाचे मुख्यमंत्री होते. तेव्हा आम्ही पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले. ही स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही, याची संपूर्ण जबाबदारी ही जे वरच्या कोर्टात कमी पडले त्यांची आहे. याच गोष्टींवर चर्चा व्हायला हवी. भाजपा (BJP) आरक्षणाच्या विरोधात आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. अशी भूमिका घेणे चुकीचे आहे, अशी स्पष्ट भूमिका पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मांडली.
(हेही वाचा – OBC Caste Certificate : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत)
भाजपच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. लातूर, धाराशिव येथे बैठका झाल्यानंतर आता पुण्यात बैठका आहेत. त्यासाठी पंकजा मुंडे या पुणे जिल्ह्यात आल्या होत्या. पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, संघटनेतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा, त्यांच्याशी संभाषण व्हावे, त्यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सक्रीयपणे काम करावे. जास्तीत जास्त मताधिक्याने महायुतीची जागा निवडून येईल. यासाठी भाजपाने एक प्रयोग केला आहे. यामध्ये मी एकटी नाही, तर अनेक नेते यात आहेत. आम्ही सगळे जण १० ते १५ मतदारसंघांमध्ये जात आहोत. सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. गेले चार पाच दिवस बैठकांचे सत्र सुरू आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना भेटत आहे. पुण्यातून आता नगर जिल्ह्यात जाणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
काही जागांवर वेगळ्या चर्चा होतील
महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय हे महायुतीचे प्रमुख नेते घेतील. नक्कीच सर्व्हेक्षण होईल. काही जागांवर वेगळ्या चर्चा होतील. बाकी जिथे निर्णय घ्यायचे आहेत, तो घेऊन दिल्लीतील वरिष्ठांपर्यंत तो नेला जाईल आणि अंतिम यादी ठरेल. ज्या पक्षांमधून महायुतीमधून अनेक नेते निवडणूक लढायला तयार आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. अशावेळी निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. चर्चा होईल, असे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community