ओबीसींना ज्या निकषांवर आरक्षण दिले, त्याच निकषांवर आम्हाला पण (Maratha Reservation) आरक्षण द्या, अशी मागणी करत १८०५ ते १९६७ आणि १९६७ ते २०२३ या काळातील प्रत्येक कागद तपासायचं काम सुरू आहे. या कामांत सरकारला मदत करा तसेच १ डिसेंबरपासून प्रत्येक गावांत साखळी उपोषण करा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.
मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे-पाटील यांची सांगली जिल्ह्यातील पहिली सभा आज शुक्रवारी, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता विट्यात पार पडली. सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या या सभेला विटा, कडेगाव आणि परिसरातील मोठ्या संख्येने जनता उपस्थिती होती.
(हेही वाचा – India in Final : इंडिगो विमानाच्या वैमानिकाने जेव्हा विमानातच दिले उपान्त्य सामन्यांचे अपडेट, व्हीडिओ व्हायरल )
मराठा समाजासाठी काम करण्याची वेळ आली आहे. समाजातील लोकांनी स्वत:च्या लेकरांच्या कल्याणासाठी आता मागे राहू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे तसेच गेल्या ७० वर्षांत केवळ पुरावे नाहीत, म्हणून आम्हाला आरक्ष डावलण्यात आले, मात्र आपले आंदोलन सुरू झाले आणि सरकारला जाग आली. मराठ्यांची एकजूट पाहून सरकारने नोंदी तपासायला सुरुवात केली. आता जिल्ह्याजिल्ह्यात नोंदी सापडत आहेत. मग आता आरक्षण द्यायला काय अडचण आहे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आरक्षण मिळेपर्यंत एक पाऊलदेखील मागे हटणार नाही. ७० वर्षे सत्तेत असणारे सर्व नेते आणि पक्षांना आवाहन केले.
हेही पहा –