Maratha Reservation Survey : मुस्लिमांकडून माहिती देण्यास नकार

मराठा आरक्षण संदर्भात सुरु असलेल्या सर्वेक्षणात मुंबईत वेगळा अनुभव प्रगणकांना येत असून मुस्लिम कुटुंबांकडून आपली माहिती प्रगणकांना दिली जात नाही. त्यामुळे अनेक प्रगणकांना या कुटुंबांची माहिती न नोंदवताच येत नाही. दरम्यान, जे कुटुंब आपली माहिती देणार नाही त्यांची माहिती निरंक ठेवून पुढील कुटुंबांची माहिती संकलित केली जाईल.

724
BMC School : महापालिका शाळांमधील मुले होणार क्रीडा क्षेत्रात निपुण

मराठा आरक्षण संदर्भात सुरु असलेल्या सर्वेक्षणात मुंबईत वेगळा अनुभव प्रगणकांना येत असून मुस्लिम कुटुंबांकडून आपली माहिती प्रगणकांना दिली जात नाही. त्यामुळे अनेक प्रगणकांना या कुटुंबांची माहिती न नोंदवताच येत नाही. दरम्यान, जे कुटुंब आपली माहिती देणार नाही त्यांची माहिती निरंक ठेवून पुढील कुटुंबांची माहिती संकलित केली जाईल. मात्र, ही माहिती देण्यासाठी कुणावरही दबाव आणला जाणार नाही. या संकलित माहितीच्या आधारे विश्लेषण करून शासनाला पुढील योजना तसेच निर्णय घेता येणार असल्यान शक्यतो या सर्वेक्षणाअंतर्गत सर्व महिती सर्व जाती धर्माच्या लोकांनी महापालिकेच्या प्रगणकांना देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे. (Maratha Reservation Survey)

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांच्या सर्वेक्षणाचे कामकाज मंगळवारी २३ जानेवारी २०२४ पासून सुरू झाले असून येत्या ३१ जानेवारी २०२४ पर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण होणे अपेक्षित आहे. सात दिवसांमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी चाळी, वस्ती, सोसायटी तसेच उत्तुंग इमारतींमध्ये जात प्रत्येक कुटुंबांची सर्वसाधारण माहितीसह सामाजिक, आर्थिक, आरोग्य तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती संकलित करून महाराष्ट्र राज्य मागास आयोगाने निश्चित केलेल्या ऍपवर अपलोड केली जात आहे. (Maratha Reservation Survey)

(हेही वाचा – OBC Rally : आता ओबीसी समाजही ‘याच’ दिवशी मुंबईत धडकणार; ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा)

मुस्लिम कुटुंबांकडून माहिती देण्यास नकार

मात्र, या सर्वेक्षणासाठी घरोघरी जाणाऱ्या प्रगणकांना चाळी, वस्त्यांमधील अनेक कुटुंबांकडून चांगले सहकार्य मिळत आहे, तर मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, उच्चभ्रु वस्त्या, टोलेजंग इमारती आदींमध्ये या प्रगणकांना योग्य प्रकारे सहकार्य केले जात नाही. त्यातच आता चाळी, वस्ती तसेच इमारतींमध्ये मुस्लिम कुटुंबांकडून आपली माहिती देण्यास नकार देत असल्याचा अनुभव प्रगणकांना येत आहे. प्रगणकांच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम कुटुंबाकडून आम्ही आरक्षणाचा लाभ घेत नाही, मग आम्ही आमची माहिती का द्यावी असा सवाल केला जातो. (Maratha Reservation Survey)

त्यामुळे आमच्या समाजात आरक्षणाचा लाभच जर कुणी घेत नसेल आणि आम्हाला आरक्षणाचीच गरज नाही तर आम्ही आमच्या कुटुंबाची माहिती का द्यावी असा सवाल करत मुस्लिम कुटुंब आपली माहिती देत नसल्याचे प्रगणकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या मुस्लिम कुटुंबाकडून माहिती देण्यास नकार दिला जातो, त्यांबाबतची माहिती वरिष्ठांना मेल द्वारे कळवली जाते असे प्रगणकांचे म्हणणे आहे. मुंबईतील कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, देवनार, वांद्रे, मस्जिद बंदर, भायखळा, पायधुणी, कांदिवली, मालाड मालवणी, अंधेरी, खार, माहिम, शिवडी आदी भागांमध्ये मोठ्याप्रमाणात मुस्लिम समाज राहत असून याठिकाणी प्रगणकांना हा अनुभव येत असल्याचे बोलले जात आहे. (Maratha Reservation Survey)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.