Maratha Reservation Survey : मुंबईतील केवळ ७० टक्के घरांनीच दिली माहिती

सर्वेक्षणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३८ लाख ६२ हजार १९० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यातील ०४ लाख ०४ हजार ५७ कुटुंबांन आपली माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला तर ७ लाखा ०९ ८५७ घरे बंद आढळून आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

1151
BMC School : महापालिका शाळांमधील मुले होणार क्रीडा क्षेत्रात निपुण

मागील २३ जानेवारीपासून सुरु झालेल्या मराठा आरक्षण सर्वेक्षणात (Maratha Reservation Survey) ३१ जानेवारीपर्यंत एकूण ९९.४५ टक्के लोकांच्या घरांचा सर्वे पूर्ण झाला. सर्वेक्षणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३८ लाख ६२ हजार १९० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यातील ०४ लाख ०४ हजार ५७ कुटुंबांन आपली माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला तर ७ लाख ०९ ८५७ घरे बंद आढळून आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ २७ लाख कुटुंबांनीच आपली माहिती दिल्याने या आधारेच आता मराठा आरक्षणासाठीची कुणबी जातीच्या नोंदी समोर येणार आहे. (Maratha Reservation Survey)

मुंबई महापालिकेच्यावतीने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वे (Maratha Reservation Survey) सुरु केले. या सर्वेक्षणाचे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले होते. यासाठी महापालिकेचे ३० हजार कर्मचारी घरोघरी जावून सर्वेक्षणाचे काम करत होते. हे सर्वेक्षण ३१ जानेवारी  रोजी पूर्ण झाले असून शेवटच्या दिवशी एकूण ३९ लाख कुटुंबांपैंकी ३८ लाख ६२ हजार १९० अर्थात ९९.४५ टक्के घरांना भेटी देऊन सर्वेक्षणात (Maratha Reservation Survey) केले. यामध्ये ७० टक्के अर्थात २७ लाख ४७ हजार ६९९ कुटुंबांनी आरक्षणासंदर्भातील माहिती घरोघरी गेलेल्या प्रगणकांना दिली. तर १९. २ टक्के अर्थात ७ लाख ०९ हजार ८५७ कुटुंबांची घरे बंद आढळून आली तर साडेदहा टक्के अर्थात ४ लाख ०४ हजार ५७ कुटुंबांनी आपली माहिती देण्यास नकार दिल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. (Maratha Reservation Survey)

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी या सर्वेक्षणाला सुरुवात झाल्याने ३९ लाख घरांचे सर्वेक्षण ३१ जानेवारी रोजी पर्यंत पूर्ण केले जाईल असा दावा केला होता. त्यानुसार केवळ अर्धा टक्का लोकांच्या घरांच्या भेटी होऊ शकल्या नसून ९९. ४५ टक्के कुटुंबांची माहिती गोळा करण्यास महापालिकेला यश आले आहे. मुंबईत  २५ जानेवारी रोजी सर्वाधिक म्हणजे ६ लाख ६७ हजार ६७१ घरांना भेटी देण्यात आल्या. (Maratha Reservation Survey)

(हेही वाचा – Nashik Police : पोलीस मित्र निघाला अट्टल गुन्हेगार; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई)

अशाप्रकारे करण्यात आले घरांचे सर्वेक्षण

२३ जानेवारी २०२४ :  २,६७, २०३

२४ जानेवारी २०२४ :   ५,८१,५२६

२५ जानेवारी २०२४ :  ६, ८७,७६१

२६ जानेवारी २०२४ :  ४, ५३,४७७

२७ जानेवारी २०२४ :  ४, ८२, ०४६

२८ जानेवारी २०२४ :  ३, ९०, ५८१

२९ जानेवारी २०२४ :  ४, १८,८२७

३० जानेवारी २०२४ :  ४, १८,४२५

३१ जानेवारी २०२४ :  १, ६२,३४४ (Maratha Reservation Survey)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.