मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या बेमुदत उपोषणाचा आज (मंगळवार २० फेब्रुवारी) अकरावा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या मागणीवर ते ठाम आहेत. सगे-सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही, तर येत्या २१ फेब्रुवारीला आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
(हेही वाचा – Manoj Jarange : सगेसोयऱ्यांना आरक्षण न दिल्यास पश्चातापाची प्रचिती येईल)
याच पार्श्वभूमीवर आज म्हणजेच २० फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा (Manoj Jarange) प्रश्न निकाली निघेल, अशी अनेकांची धारणा आहे. अशातच समजाला दहा टक्के आरक्षणाचा मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार आता मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण मंजूर झाले आहे.
मराठा समजाला महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण –
मराठा समजाला (Maratha Reservation) महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील मागासवर्ग आयोगानं दिलेला अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. विशेष अधिवेशनाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मागासवर्ग आयोगाच्या आहवालाला मंजुरी दिली आहे. थोड्यावेळात एकनाथ शिंदे विधिमंडळ अधिवेशनात विधेयक सादर करतील. मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाज मागस असल्याचेही म्हटले आहे. तसेच ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक परिस्थिती असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
मराठा समजाला दहा टक्के आरक्षण, मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंत्रिमंडळाची मंजुरी #maratha #marathaaarakshan #marathareservation #manojjarangepatil #jarangepatil #hindusthanpostmarathi #breraking #marathinews pic.twitter.com/YJipLmpkPz
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) February 20, 2024
(हेही वाचा – PM-Usha Scheme : मुंबई विद्यापीठास पायाभूत आणि शैक्षणिक विकासासाठी २० कोटीचे अनुदान मंजूर)
जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी विशेष अधिवेशनापूर्वी (Maratha Reservation) अंतरवाली सराटी येथे मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळाले नाही तर विधिमंडळात पारित होऊ घातलेल्या मराठा आरक्षण विधेयकाचा बहुतांश समाजाला कोणताही फायदा नसल्याचे सांगितले.
काय म्हणाले जरांगे पाटील –
गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मराठा समाज(Maratha Reservation) झुंजत आहे. आम्ही (Manoj Jarange) मागणी एक केली आणि सरकार करतंय दुसरंच. राज्य सरकारने मराठा आरक्षण कायद्यासाठी अधिवेशन बोलावले आहे. पण या कायद्यातंर्गत मिळालेल्या स्वतंत्र आरक्षणाचा फायदा १५० ते २०० मराठ्यांनाच मिळणार आहे. आज करोडो मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातील आमचं आरक्षण आम्हाला द्या, अशी आहे. साडेतीन महिन्यांपूर्वी सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सगेसोयऱ्यांचा कायदा पारित करु, असा शब्द दिला होता. मग त्याची अंमलबजावणी करा. विशेष अधिवेशनात सुरुवातीला तातडीने सगेसोयऱ्यांचा विषय चर्चेला घ्या आणि तातडीने अंमलबजावणी करा. अन्यथा राज्यात मराठा समाजाचे भयंकर आंदोलन उभे राहील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.(Maratha Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community