महाराष्ट्राच्या भल्यासाठी… सामाजिक संतुलन राखण्यासाठी… राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होऊ द्यायचा नसेल तर सर्व राजकीय पक्षांनी जबाबदारीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि यामध्ये विरोधक आपली भूमिका स्पष्ट करणार नसतील तर याचा अर्थ ते दुटप्पी वागून महाराष्ट्रातील मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल व फसवणूक करत आहेत,असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला. (Maratha Reservation)
दरम्यान मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण (Maratha – OBC reservation) देण्याचा कुठला कायदेशीर मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध आहे.त्यांच्याही हातात तशी संधी असताना त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का दिले नाही.? अशीही परखड विचारणा त्यांनी शरद पवार, उध्दव ठाकरे आणि नाना पटोले यांना केली.
याशिवाय संबंधितांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसंदर्भात त्यांची भूमिका काय आहे हे महाराष्ट्रासमोर येऊन सांगितले पाहिजे.तशा पध्दतीने आरक्षण देण्याची त्यांची भूमिका असेल तर कोणता कायदेशीर मार्ग त्यांच्याकडे आहे हेही त्यांनी महाराष्ट्राला सांगावे असे खुले आवाहनही पाटील यांनी केले.
(हेही वाचा – मातोश्रीवर बोलावून शंकराचार्यांचा राजकारणासाठी वापर केला; Raju Waghmare यांची खरमरीत टीका)
राज्यातील सामाजिक संतुलन टिकले पाहिजे यासाठी सरकारने बैठक आयोजित केली होती.परंतु विरोधकांनी जाणूनबुजून त्या बैठकीकडे पाठ फिरवली.कारण त्यांनी बैठकीला हजेरी लावली असती तर सर्व राजकीय पक्षांची काय भूमिका आहे हे समोर आले असते याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.
सोमवारी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी या सरकारला आरक्षणाचा प्रश्न हाताळता आला नाही.मविआचे सरकार आल्यावर प्रश्न मार्गी लावू हे विधान गृहीत धरले तर मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसंदर्भात त्यांची भूमिका काय आहे.आणि तशाच पध्दतीने आरक्षण देण्याची त्यांची भूमिका असेल तर कोणता कायदेशीर मार्ग आहे हेही सांगावे, असे खुले आव्हानही पाटील यांनी दिले. (Maratha Reservation)
(हेही वाचा – राज्यात जातीय सलोखा राखा; Narayan Rane यांचे राजकीय पक्षांना आवाहन)
इंद्रा साहनी यांचा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे त्यात केंद्र सरकारने घटनात्मक दुरुस्ती करुन आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशा पध्दतीची मागणी करुन विरोधक हात वर करतील असा जोरदार प्रतिहल्ला करत पाटील म्हणाले की,यापूर्वीही सर्वपक्षीय बैठक झाली होती.त्या बैठकीत सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशीच भूमिका घेतली होती.त्यामुळे बंद खोलीत झालेल्या बैठकीत मागणी वेगळी करायची आणि बाहेर आल्यावर मात्र वेगळया प्रतिक्रिया द्यायच्या याबद्दल पाटील यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community