मागील काही महिन्यांपासून (Maratha Reservation) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचा दौरा करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देऊ नयेत या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आज भव्य सभा होत आहे. दरम्यान, याच सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी एक महत्वाचे विधान केले आहे.
(हेही वाचा – Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे, बस नाम ही काफी है!)
जरांगे पाटील म्हणाले की, ” मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा समाजातील राजकीय नेत्यांचा पाठींबा मिळत नाही. जर त्यांचा पाठींबा मिळाला तर, फक्त दोन तासांत मराठा आरक्षण मिळेल,” असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.” ते साताऱ्यामधून बोलत होते.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
“मी एकटा नाही, माझ्या सोबत 50 ते 60 टक्के मराठे (Maratha Reservation) म्हणजेच 6 कोटी लोकं आहे. राजकीय लोकांचा पाठींबा मिळत नाही आणि ते देणार देखील नाही. त्यांना फक्ते आम्ही हवे आहे, 70 वर्ष त्यांनी आमचा फक्त वापर केला. आमची तीच अडचण आहे. त्यामुळे मराठा समाजातील सर्व राजकीय नेते एकत्र आल्यास फक्त दोन तासांत आम्हाला आरक्षण मिळेल. नेते एक होत नाही हेच आमचं दुःख आहे. पण आता आम्हाला देखील त्यांची गरज नाही. कारण आता आमचा समाजच एकवटला असल्याचं जरांगे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community