Maratha Reservation : कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही; अजित पवारांचा जरांगेंना इशारा

Maratha Reservation : संविधानाचा आदर झाला पाहिजे, जर कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, हे देखील लक्षात ठेवा, असा इशारा अजित पवार यांनी मराठा आरक्षणासाठी कायदा हातात घेणाऱ्यांना दिला आहे.

288
Maratha Reservation : कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही; अजित पवारांचा जरांगेंना इशारा
Maratha Reservation : कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही; अजित पवारांचा जरांगेंना इशारा

मराठा आरक्षणासाठी काही लोक टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईला येण्याबाबत घोषणा करत आहेत. (Maratha Reservation) संविधानावर देश चालत आहे, जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, हे देखील लक्षात ठेवा, असा इशारा अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) राज्यात दौरा करत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी २० जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून मराठा समाज मुंबईसाठी निघणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा – Onion Export : इंडोनेशियाने भारताकडे केली ९ लाख मेट्रिक टन कांद्याची मागणी)

… तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यात कुणाचेही दुमत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात याबाबत एकमत आहे. राज्यात आधीपासूनच ६२ टक्के आरक्षण आहे. यासाठी आता कायद्याचे मार्ग तपासून पाहावे लागणार आहेत. काही लोक टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईला (Mumbai) येण्याबाबत घोषणा करत आहेत, आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी संविधान दिले आहे, या संविधानावर देश चालत आहे. संविधानाचा आदर झाला पाहिजे, जर कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, हे देखील लक्षात ठेवा, असा इशारा अजित पवार (Ajit Pawar) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) कायदा हातात घेणाऱ्यांना दिला आहे.

मराठेही उत्तर देतील – मनोज जरांगे यांचे प्रत्युत्तर

शेवटी त्यांनी आता पोटातले ओठात आणलेच, पहिल्यापासून तुम्ही मराठ्यांच्या विरोधातच काम केले आहे. दहा पाच जणांना जवळ करून बाकी करोडो मराठ्यांचे वाटोळे केले, शांततेत येणाऱ्यांवर कारवाई करून दाखवावी, मग मराठेही शांततेत उत्तर देतील, असे जरांगे पाटील यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रत्युत्तर दिले आहे.

(हेही वाचा – 100th Natya Sammelan : ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि चॅट जीपीटी हे रंगभूमीसाठी पर्याय ठरू शकत नाहीत; परिसंवादात उमटला सुर)

अपघाताने सत्तेत आलेला माणूस

या वेळी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करून टीका केली. जरांगे पाटील म्हणाले, ‘अजित पवार अपघाताने सत्तेत आलेला माणूस आहे. तो जर असे बोलत असेल, तर आम्ही त्याला सरकार मानत नाही. मुंबईला जाणार आणि ओबीसीतून आरक्षण (OBC reservation) मिळवणारच, तू कारवाई कर, केव्हा मराठे शांततेत उत्तर देतील, असे आव्हान जरांगे पाटील यांनी दिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.