Maratha Reservation : उद्धव ठाकरे यांचे सर्व खासदारांना राजीनामा देण्याचे आवाहन; म्हणाले आम्ही तुमच्यासोबत…

106
Maratha Reservation : उद्धव ठाकरे यांचे सर्व खासदारांना राजीनामा देण्याचे आवाहन; म्हणाले आम्ही तुमच्यासोबत...
Maratha Reservation : उद्धव ठाकरे यांचे सर्व खासदारांना राजीनामा देण्याचे आवाहन; म्हणाले आम्ही तुमच्यासोबत...

मराठा आरक्षणावर अजून मार्ग निघालेला नाही. (Maratha Reservation) दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना देखील भेटण्याची माझी तयारी आहे. पंतप्रधानांचे कर्तव्य आहे की, राज्यात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे. जेव्हा केंद्राची कॅबिनेट बैठक होईल, तेव्हा राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षण विषय कॅबिनेटमध्ये मांडावा. जर एवढे करून देखील पंतप्रधानवर परिणाम होणार नसेल, तर सर्व 48 खासदारांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्र एकजुटीची हीच वेळ आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मराठा आंदोलनप्रश्नी आमदार-खासदार राजीनामा देत आहेत. याविषयी प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरे यांनी, ‘गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी आमदार-खासदार राजीनामा देत आहेत. 31 डिसेंबरनंतर त्यांना आपण अपात्र ठरणार हे माहीत आहे त्यामुळे हे आता राजीनामा देत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे जेव्हा मंत्रिमंडळ विस्तारातील वाद होता, तेव्हा दिल्लीला गेले. पण आता मराठा आरक्षणासारखा मोठा मुद्दा असताना ते एकदाही का दिल्लीला गेले नाहीत’, असा सवाल पत्रकार परिषदेत केला. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Mumbai Crime : मुलुंड येथील गार्डनच्या शौचालयात जळालेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह )

‘जरांगे पाटलांना माझी विनंती आहे, की कृपा करून तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका. तुमच्यासारख्या लढवय्यांची राज्याला आणि समाजाला गरज आहे. मराठा समाजातल्या तरुणांनाही मी विनंती करतो की, कृपा करून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका’, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली. (Maratha Reservation)

आमदार अपात्रता याचिकेविषयी उद्धव ठाकरे प्रथम बोलले. ते म्हणाले, ”मी दसऱ्याच्या भाषणात बोललो होतो की, अपात्रतेचा निर्णय आहेच. पण त्यानिमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्व आपल्या देशात काय असणार आहे, त्यावर आधारित देशाची घटना आणि लोकशाही टिकणार आहे कि नाही, हेही निर्णयावरून ठरणार आहे. भारतातली लोकशाही सर्वांत मोठी आहे. ती धोक्यात येणार असेल, तर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.” (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.