मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी १७ दिवस उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण गुरुवार १४ सप्टेंबर रोजी मागे घेतलं असलं तरीही त्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. कोणीही कितीही दडपण आणले तरीही मी माघार घेणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
आरक्षणाविना मराठा (Maratha Reservation) समाजातील पाच पिढ्या बरबाद झाल्या आहेत. यापुढील पिढ्या बरबाद होऊ देणार नाही. सत्ताधारी अथवा विरोधकांनी कितीही दडपण आणले तरीही आता माघार घेणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचा दौरा करणार असून, त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी मेळावा घेणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.
(हेही वाचा – PM Narendra Modi : “भारताची विश्वासार्हता वाढली”; मन की बात मधून पंतप्रधान मोदींनी केले जी २० आणि चंद्रयान मोहिमेचे कौतुक)
पुढे बोलतांना ते म्हणाले की; “त्यांच्याकडे असे कोणतेही हत्यार वा शक्ती नाही की, त्याचा वापर करून ते मला फोडू शकतील. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत त्यांचा डाव चालणार नाही. सत्ताधारी, विरोधी पक्षातील नेत्यांची शान मराठा समाजाने (Maratha Reservation) वाढविली आहे. आता कोण नागपूरला जातेय, कोणी कोल्हापूरला जातेय, कोणी पुण्याला जाऊन उचकून देतेय. कोणी कितीही उचकावले तरी मराठा समाज व ओबीसी समाज वाद घालणार नाही व आम्ही समोरासमोर येणार नाही. दिलेल्या मुदतीत शासनाने आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, अन्यथा आमरण उपोषण पुन्हा सुरू केले जाईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला. राज्यातील समाजबांधवांनी शांततेत आंदोलन करावे, कोठेही उद्रेक करू नये,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अंतरवाली सराटी येथे शनिवारी (२३ सप्टेंबर) जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची (Maratha Reservation) विचार मंथन बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा आरक्षण हा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community