मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अभियंत्यांनाही कामाला जुंपल्याने अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. परंतु या अतिरिक्त कामांसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये मानधन आणि पाचशे रुपये प्रवास भत्ता दिला जाणार आहे. तसेच प्रथम आणि दृत्तीय श्रेणीतील अधिकाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या ५० टक्के रक्कम मानधन या अतिरिक्त कामांसाठी दिला जाणार आहे. (Maratha Survey)
मुंबई महानगरपालिकेतील (Mumbai Municipal Corporation) विविध विभागातील, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह प्रमुख खात्यांमधील विविध पदांवरील अभियंत्यांना मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याबाबत नेमणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) सहाय्यक अभियंत्यांना पर्यवेक्षक व दुय्यम व कनिष्ठ अभियंत्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्याची बाब बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने निदर्शनास आणून अभियंत्यांमध्ये याबाबत नाराजी असल्याचे सांगितले. सर्वेक्षण करणे ही तांत्रिक बाब नाही व अभियंत्यांची नेमणूक मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) तांत्रिक कामे करण्यासाठीच केलेली असल्याचे अभियंत्यांच्या संघटनेचे म्हणणे होते. अभियंत्यांचा अभियांत्रिकी कामांकरीताच वापर करणे हे प्रशासनाकडून अपेक्षित असल्याचे त्यांनी या पत्रात म्हणले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) अभियंता वर्गाला या सर्वेक्षणाच्या कामातून वगळावे अशाप्रकारची विनंती त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (Maratha Survey)
(हेही वाचा – S. Jaishankar : जागतिक स्तरावर वाढला भारताचा दबदबा; एस. जयशंकर काय म्हणाले…)
शासनाच्या निर्देशानुसार मुंबईतील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या कामांसाठी महापालिकेच्या सुमारे २५ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे आदेश काढण्यात आले आहे. त्यामुळे शासनाकडून याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर यासर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल आणि त्यानुसार सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात होईल,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्वेक्षणाच्या कामासाठी प्रणाली विकसित केली जात असून हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणाचा कार्यक्रम जाहीर होईल. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्षात सर्वेक्षणाचे काम सुरु होईल, परंतु सध्या या सर्वेक्षणाचे काम सुरु व्हायचे आहे. परंतु या कामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या परिपत्रकानुसार दहा हजार रुपये मानधन आणि पाचशे रुपये प्रवास भत्ता दिला जाणार आहे. याला महापालिका प्रशासकांची (Municipal Administrator) मान्यताही प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच या कामकाजासाठी नियुक्त करण्यात येणारे वर्ग दोन व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी यांना एक महिन्याच्या मूळ वेतनाच्या ५० टक्के इतकी रक्कम मानधन म्हणून दिली जाणार आहे. (Maratha Survey)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community