केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासोबतच प्राकृत, पाली, बंगाली, आसामी या भाषानांही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. अधिवेशनात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून असलेली महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यात आल्याची प्रतिक्रिया मराठी साहित्यिकांकडून दिली जात आहे. (Marathi Abhijat Bhasha)
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हे नक्कीच अभिमानाची बाब आहे. मात्र मराठी भाषा ही ज्ञानाभाषा व्हावी, अशी प्रतिक्रिया साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली आहे. याआधी भाजपा नेते विनोद तावडे सांस्कृतिक मंत्री असताना त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. ज्यानंतर दि. ३ ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. (Marathi Abhijat Bhasha)
Join Our WhatsApp Community