३ ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासोबतच प्राकृत, पाली, मराठी, बंगाली, आसामी या भाषेनाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अधिवेशनात ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यात आल्याची प्रतिक्रिया मराठी साहित्यिकांकडून दिली जात आहे. याविषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आनंद व्यक्त केला आहे. (Marathi Abhijat Bhasha)
(हेही वाचा – गांधीहत्येमुळे सावरकर, ब्राह्मण समाज आणि हिंदुत्व बदनाम; Sharad Ponkshe यांनी व्यक्त केली खंत)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय म्हणाले?
समस्त मराठी जणांसाठी आनंदाचा क्षण!
आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 3, 2024
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार व महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन! पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी व उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील व कटिबद्ध आहोत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट करून या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Marathi Abhijat Bhasha)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community