‘काका असूनही विक्रम गोखलेंच्या निधनाबाबत पोस्ट का शेअर केली नाही?’, अभिनेत्री सखी गोखलेने ट्रोलर्सना दिले उत्तर

248

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विक्रम गोखले यांच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्रासह संपूर्ण राज्यातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर बॉलिवूड तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेकांनी पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. पण आपले काका असूनही मराठीतील आघाडीची अभिनेत्री सखी गोखले हिने विक्रम गोखले यांच्याबद्दल एकही शपब्द न लिहिल्यामुळे, सखीला सोशल मीडियावर टीकेचे धनी करण्यात येत आहे. या सर्व ट्रोलर्सना आता सखीने उत्तर दिले आहे.

विक्रम गोखले हे सखीचे वडील मोहन गोखले यांचे भाऊ असल्याने ते सखीचे सख्खे काका असल्याच्या अफवा उठवण्यात आल्या होत्या. त्याबाबत सखीने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे. विक्रम गोखले आणि आपले वडील मोहन गोखले हे एकमेकांचे भाऊ नसून, त्यांच्या आणि आमच्या कुटुंबामध्ये कोणतंही नातं नाही. फक्त आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये मैत्रीचे नाते आहे, असे सखीने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः ‘त्यांचा हेतू वाईट नव्हता, पण…’ रामदेव बाबांच्या ‘त्या’ विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया)

ते दोघे भाऊ नव्हते

विक्रम गोखले हे श्रेष्ठ अभिनेते असून, लहानपणापासून मी त्यांची पडद्यावरची जादू अनुभवली आहे. त्यांचं आपल्याला सोडून निघून जाणं हे अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीचे फार मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरुन येणं शक्य नाही. पण मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, विक्रम गोखले आणि माझे वडील मोहन गोखले हे दोघेही भाऊ-भाऊ नव्हते. आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत,त्यामुळे इंटरनेटवरील प्रत्येक गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेऊ नका, असे सखीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

WhatsApp Image 2022 11 28 at 3.32.32 PM 1 1

ज्ञानात भर घाला

तसेच विक्रम गोखले यांच्या शी माझे नाते असो किंवा नसो, मी त्यांच्याबद्दल पोस्ट करावी की नाही ही माझी चॉईस आहे. मी पोस्ट शेअर केली नाही म्हणजे मला दुःखच झालं नाही, असा त्याचा अर्थ होतो का? त्यामुळे मला ट्रोल करुन अनेक जण माझ्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत. पण संताप व्यक्त करण्याआधी त्यामागचे कारण शोधा. माझ्यावर आपला वेळ खर्च करण्यापेक्षा विकिपीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीचा आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी वापर करा, अशा शब्दांत सखीने आपल्या ट्रोलर्सना खडसावले आहे.

(हेही वाचाः आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा फतवा, डॉक्टर आणि वैद्यकीय अधिका-यांना बसणार चाप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.