सविता मालपेकर यांची सोनसाखळी चोरणारा चोर गजाआड!

सविता मालपेकर सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जेवणानंतर फेरफटका मारण्यासाठी शिवाजी पार्क येथील राजा बडे चौक या ठिकाणी गेल्या होत्या.

जेष्ठ मराठी अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील सोन्याची चैन दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे चोरीला गेली होती. त्या या ठिकाणी बसल्या असताना एका चोराने त्यांची चैन खेचली. हा धक्कादायक प्रकार रात्री नऊच्या सुमारास गेट क्रमांक 5 वर घडला होता. त्यानंतर सविता मालपेकर यांनी त्वरीत पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी देखील त्वरीत तपासाची चक्र फिरवली आणि 24 तासांच्या आत त्या भुरट्या चोराला पकडले.

काय घडले होते?

अभिनेत्री सविता मालपेकर या शिवाजी पार्कमध्ये फेरी मारून झाल्यानंतर त्या कट्ट्यावर आराम करत बसल्या होत्या. तेवढ्यात एका व्यक्तीने त्यांना वेळ विचारली. हातात घड्याळ नसल्यामुळे त्या काही त्याला वेळ सांगू शकल्या नाही. परंतु त्याच्यासोबत संभाषण करत असतानाच एक व्यक्ती बाईकवरून आला अन् त्याने त्यांची चैन हिसकावून पळून गेला. या घटनेनंतर पाच मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहोचले. राजा बढे चौकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याची ओळख पटली. तो माहीमचा निवासी असल्याची माहिती समोर आली. पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबानुसार या सोनसाखळीच्या किंमत साधारण एक लाख 20 हजार किंमत असून, ती 30 ग्रॅम वजनाची आहे. या प्रकरणी सविता मालपेकर यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

(हेही वाचा : ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीला सोनसाखळी चोरांचा फटका)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here