Marathi Bhasha Abhijat Darja : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले निर्णयाचे स्वागत

287
Marathi Bhasha Abhijat Darja : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले निर्णयाचे स्वागत
Marathi Bhasha Abhijat Darja : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले निर्णयाचे स्वागत

३ ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा (Marathi Bhasha Abhijat Darja) दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासोबतच प्राकृत, पाली, मराठी, बंगाली, आसामी या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अधिवेशनात ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यात आल्याची प्रतिक्रिया मराठी साहित्यिकांकडून दिली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहेत.

(हेही वाचा – Devendra Fadnavis म्हणतात,…पुन्हा येणार!)

एक्स या सामाजिक माध्यमावर पोस्ट करून मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे,

माझा मराठाचि बोलु कौतुके।
परि अमृतातें ही पैजा जिंके ॥
समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!

अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!

अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की,

ऐतिहासिक आणि सोन्याचा दिवस.
अत्यंत अभिमानाचा क्षण !

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी… (Marathi Bhasha Abhijat Darja)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.