-
प्रतिनिधी
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (Marathi Bhasha Gaurav Din) गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी ५ वाजता विशेष गौरव व पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संसद सदस्य तसेच विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. (Marathi Bhasha Gaurav Din)
ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब बोराडे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
या सोहळ्यात मराठी भाषा विभागाच्या २०२४ सालच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना “विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार” जाहीर झाला आहे. तसेच, “श्री. पु. भागवत पुरस्कार” ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे यांना देण्यात येणार आहे. (Marathi Bhasha Gaurav Din)
(हेही वाचा – Plane Crash : सुदानमध्ये लष्कराचे विमान कोसळले, १० जणांचा मृत्यू)
भाषा व साहित्य पुरस्कार विजेते
- डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार : डॉ. रमेश सिताराम सूर्यवंशी
- मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार : भीमाबाई जोंधळे
ग्रामीण वाङ्मय व प्रौढ वाङ्मय पुरस्कार विजेते
- कवी केशवसुत पुरस्कार (काव्य) : एकनाथ पाटील (अनिष्ठकाळाचे भयसूचन)
- राम गणेश गडकरी पुरस्कार (नाटक/एकांकिका) : मकरंद साठे
- हरि नारायण आपटे पुरस्कार (कादंबरी) : आनंद विंगकर
- दिवाकर कृष्ण पुरस्कार (लघुकथा) : दिलीप नाईक-निंबाळकर
- अनंत काणेकर पुरस्कार (ललितगद्य) : अंजली जोशी
- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार (विनोदी लेखन) : शेखर गायकवाड
- न. चिं. केळकर पुरस्कार (चरित्र लेखन) : विवेक गोविलकर
- लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार (आत्मचरित्र) : डॉ. वसंत भा. राठोड
- के. क्षीरसागर पुरस्कार (समीक्षा व संशोधन) : समीर चव्हाण (Marathi Bhasha Gaurav Din)
इतर महत्त्वाचे पुरस्कार
- शाहू महाराज पुरस्कार (इतिहास) : प्रकाश पवार
- नरहर कुरुंदकर पुरस्कार (भाषाशास्त्र) : उज्ज्वला जोगळेकर
- महात्मा जोतीराव फुले पुरस्कार (विज्ञान व तंत्रज्ञान) : सुबोध जावडेकर
- वसंतराव नाईक पुरस्कार (शेतीविषयक लेखन) : डॉ. ललिता विजय बोरा
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार (उपेक्षित साहित्य) : सुनीता सावरकर
- ना. गो. नांदापूरकर पुरस्कार (तत्त्वज्ञान व मानसशास्त्र) : या. रा. जाधव
- कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार (शिक्षणशास्त्र) : हेमंत चोपडे
- डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार (पर्यावरण) : माधव गाडगीळ
- रा. ना. चव्हाण पुरस्कार (संपादित साहित्य) : संपादक रविमुकुल
- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार (अनुवादित साहित्य) : श्रीकांत अरूण पाठक
(हेही वाचा – राज्यातील दिव्यांग युवकांसाठी रोजगाराच्या संधी – CM Devendra Fadnavis)
बाल वाङ्मय व प्रथम प्रकाशन पुरस्कार
- बालकवी पुरस्कार (बालकविता) : प्रशांत असनारे
- भा. रा. भागवत पुरस्कार (बालनाटक) : संजय शिंदे
- साने गुरुजी पुरस्कार (बालकादंबरी) : रेखा बैजल
- राजा मंगळवेढेकर पुरस्कार (बालकथा) : शरद आपटे
- यदुनाथ थत्ते पुरस्कार (बालज्ञान साहित्य) : डॉ. प्रमोद बेजकर
- ना. धो. ताम्हणकर पुरस्कार (बालसाहित्य संकीर्ण) : डॉ. आनंद नाडकर्णी (Marathi Bhasha Gaurav Din)
सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार
- सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार (अनुवादित साहित्य) : योगिनी मांडवगणे (आल्बेर काम्यू – ला मिथ द सिसीफ)
या सर्व पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्याद्वारे मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीला चालना मिळणार असून, नवोदित लेखकांनाही प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community