मराठी चित्रपट महोत्सव २०२५ : ४१ चित्रपटांची मेजवानी; सांस्कृतिक मंत्री Ashish Shelar यांची घोषणा

66
Award : राज्य शासनाचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर
  • प्रतिनिधी

मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे २१ ते २४ एप्रिल २०२५ दरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव २०२५’ आयोजित करण्यात येत आहे. यात ४१ मराठी चित्रपट दाखवले जाणार असून, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मंगळवारी मंत्रालयात याची घोषणा केली. सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच पु. ल. देशपांडे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत आहे.

(हेही वाचा – Bala Nandgaonkar यांच्या पराभवात हातभार लावणाऱ्या नानांना शिवसेनेकडून बक्षिसी)

महोत्सवाचे उद्घाटन २१ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता होईल, तर रात्री ८ वाजता रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ हा उद्घाटन चित्रपट दाखवला जाईल. २४ एप्रिलला दिग्पाल लांजेकर यांचा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा समारोप चित्रपट दाखवला जाईल. रविंद्र नाट्यमंदिर, मिनी थिएटर आणि प्रायोगिक रंगमंचावर हे चित्रपट दाखवले जातील. यात सामाजिक, ग्रामीण, ऐतिहासिक, पर्यावरण, स्त्रीप्रश्न, विनोदी आणि व्यावसायिक यशस्वी चित्रपटांचा समावेश आहे. यामध्ये ‘बाईपण भारी देवा’, ‘पावनखिंड’, ‘वाळवी’, ‘मी वसंतराव’, ‘जयंती’, ‘तेरव’ यांसारखे चित्रपट दाखवले जाणार आहेत. सर्व चित्रपट विनामूल्य पाहता येतील, यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन नावनोंदणी सुरू आहे. (Ashish Shelar)

(हेही वाचा – Kanhaiya Kumar यांच्या विरोधात गुन्हा दाखल; भाजपाने का केली तक्रार?)

महोत्सवात परिसंवाद आणि कार्यशाळांचेही आयोजन आहे. २२ एप्रिलला कौशल इनामदार यांची ‘काल-आज-उद्याचे मराठी चित्रपट गीत-संगीत’ कार्यशाळा, हंसल मेहता यांची मुलाखत आणि चित्रपट तंत्रावरील परिसंवाद होईल. २३ एप्रिलला सिनेमापत्रकार कार्यशाळा, मराठी चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय स्थान आणि प्रसारण-वितरण यावर चर्चा होईल. २४ एप्रिलला मराठी चित्रपटांचे व्यावसायिक गणित आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील भवितव्य यावर परिसंवाद होतील. समारोप सायंकाळी ६ वाजता होईल. हा महोत्सव मराठी चित्रपटसृष्टीला नवी दिशा देणारा ठरेल, अशी अपेक्षा शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.