-
प्रतिनिधी
मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्याची घोषणा केली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महोत्सवामध्ये दर्जेदार मराठी चित्रपट सादर केले जाणार असून, या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
(हेही वाचा – Tata Steel Chess : उझबेक ग्रँडमास्टर याकुबायेवचा आर वैशालीशी हस्तांदोलनाला नकार)
आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव – एक नवा अध्याय
राज्य सरकारतर्फे गेल्या ६० वर्षांपासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. मात्र, अधिकृत मराठी चित्रपट महोत्सवाचा अभाव होता. मंत्री शेलार (Ashish Shelar) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या महोत्सवाची संकल्पना पुढे आणली. यावर्षी मुंबईत तीन दिवस चालणाऱ्या पहिल्या महोत्सवाचे आयोजन होणार आहे.
महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचू न शकलेले उत्कृष्ट मराठी चित्रपट दाखवले जातील. चित्रपट सादरीकरणासोबतच त्या चित्रपटांच्या टीमसोबत थेट संवाद, विशेष परिसंवाद, अभ्यासकांच्या मुलाखती आणि चित्रपट निर्मितीशी संबंधित चर्चा देखील होणार आहे. महोत्सवाच्या तारखा आणि नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार असून, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत आयोजन होणार आहे.
(हेही वाचा – जीबीएस आजाराबाबत सरकार सतर्क; सार्वजनिक आरोग्य मंत्री Prakash Abitkar यांचे प्रतिपादन)
साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार – प्राथमिक फेरीची नामांकने जाहीर
२०२२ या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी प्राथमिक फेरीची नामांकने जाहीर झाली आहेत. अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, 4 ब्लाइंड मेन, समायरा, गाभ, ह्या गोष्टीला नावच नाही, ग्लोबल आडगाव, हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे.
(हेही वाचा – सोलापुरात Guillain Barre Syndrome चा धोका वाढला; एकाच दिवसात 9 नवीन रुग्ण)
बालकलाकार आणि तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर
उत्कृष्ट बालकलाकार :
श्रीनिवास पोकळे (छुमंतर) आणि अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय).
उत्कृष्ट कला दिग्दर्शन :
महेश कुंडलकर (उनाड).
उत्कृष्ट छायालेखन :
अभिजीत चौधरी (4 ब्लाइंड मेन), ओंकार बर्वे (ह्या गोष्टीला नावच नाही).
उत्कृष्ट संकलन :
यश सुर्वे (काटा किर्र).
उत्कृष्ट ध्वनिमुद्रण :
सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही).
उत्कृष्ट वेशभूषा :
उज्वला सिंग (ताठ कणा).
उत्कृष्ट रंगभूषा :
सुमित जाधव (ताठ कणा).
उत्कृष्ट ध्वनी संयोजन :
लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव).
(हेही वाचा – Budget 2025 : मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पात हवे आहेत कर रचनेत हे दहा बदल)
नामनिर्देशनातील महत्त्वाची नामांकने :
सर्वोत्कृष्ट कथा :
अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव), पूर्वल धोत्रे (4 ब्लाइंड मेन), सुमित तांबे (समायरा).
उत्कृष्ट पटकथा :
इरावती कर्णिक (सनी), पूर्वल धोत्रे-अभिषेक मेरुरकर (4 ब्लाइंड मेन), तेजस मोडक-सचिन कुंडलकर (पाँडिचेरी).
उत्कृष्ट अभिनेता :
प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे), वैभव तत्ववादी (पाँडिचेरी), ललीत प्रभाकर (सनी).
उत्कृष्ट अभिनेत्री :
सई ताम्हणकर (पाँडिचेरी), अमृता खानविलकर (चंद्रमुखी), सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह).
(हेही वाचा – Ind vs Eng, 3rd T20 : इंग्लंड विरुद्ध मलिकेतून नितिश कुमार दुखापतीमुळे बाद, गंभीरसाठी इशारा?)
चित्रपट रसिकांसाठी आनंदाची पर्वणी
या महोत्सवामुळे मराठी चित्रपट रसिकांना उत्कृष्ट चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, राज्य शासनाच्या अधिकृत महोत्सवाच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीला नवी ओळख आणि ग्लोबल व्यासपीठ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community