उन्हाळा खूप वाढला आहे. त्यामुळे सहाजिकच पंखा, फ्रीज, कूलर तसेच एसी या साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. सध्या महागाईही वाढली आहे. त्यात वीज बिल दरवाढीचीही भर पडली आहे. त्यामुळे ऐन गरमीमध्ये जर वीज बिल कमी करायचे असेल, तर या उपायांचा नक्की अवलंब करा.
उपाय
- फ्रिज रिकामा असेल, तर खूप वीज खर्च होते. त्यामुळे फ्रिजमध्ये नेहमी फळे, भाज्या ठेवा आणि फ्रिज नेहमी नॉर्मल मोडवर ठेवा. एकूण विजेच्या वापरांपैकी सुमारे 15 टक्के वीज एकट्या फ्रीजमध्ये वापरली जाते. भिंत आणि फ्रीजमध्ये 2 इंच अंतर ठेवावे.
- कपडे मशीनऐवजी उन्हात सुकवा. त्यामुळे वीज बील खूप वाचेल.
- घरातला एसी चालवताना आधी सर्व्हिसींग करुन घ्या आणि फिल्टर व्यवस्थित स्वच्छ करा.
- घरातील जुने बल्ब आणि ट्युबलाईट्स सीएफएल किंवा एलईडीने बदला.
- कंप्म्युटर, टी.व्ही., प्लेअर रात्रीच्या वेळेस चालू ठेवल्यास वीजेचे बिल वाढेल. घरातील उपकरणे पॉवर एक्सटेंशनला जोडून घ्या. कारण विजेचा लोड एकदम वाढल्यास उपकरण जळण्याचा धोका कमी होतो.
- तुमच्याकडे वॉटर हिटर असल्यास नेहमी ४८ डिग्रीवर ठेवा. त्यामुळे वीज कमी खर्च होईल.
- उन्हाळ्यात दिवसभर पंखा चालू असतो. त्यामुळे कमी वीज बिलासाठी बीर्डर्ड रेटेड फॅन वापरणे गरजेचे आहे.
- खिडकीतून खूप ऊन आत येते. त्यामुळे घरातील तापमान वाढते. मग एसी, कूलर, पंखाच्या वापर वाढतो. परिणामी विज बिलात भर पडते. म्हणून शक्य असल्यास खिडक्या बंद ठेवा.