नाशिकमधल्या कालिदास कला मंदिरात आयोजित केलेल्या कवि कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमात मराठी भाषिकांना प्रवेश नाकारण्यात आल्याने मराठी भाषिकांनी संताप व्यक्त केला आहे. (Marathi Marginalized) महाराष्ट्रात कार्यक्रम असून मराठी भाषिकांनाच प्रवेश नाकारल्याने मराठी भाषिक प्रेक्षकानी आक्रमक होऊन कार्यक्रम बंद पाडला. हिंदी प्रसारणी सभेतर्फे राष्ट्रीय हिंदी दिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम विनामूल्य होता; परंतु केवळ हिंदी भाषिकांना या कार्यक्रमाचे पासेस देण्यात आले होते.
(हेही वाचा – BMC : डॉ. अश्विनी जोशी यांचे मुंबई महापालिकेत कमबॅक; अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती)
कवी कुमार विश्वास यांच्या कविता ऐकण्यासाठी कला मंदिराबाहेर अनेक प्रेक्षकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्रात कार्यक्रम होऊन मराठी भाषिकांना पासेस देण्यात आले नसल्याचे लक्षात आल्यावर मराठी भाषिक प्रेक्षकांनी कलामंदिराच्या प्रवेशद्वारावर निषेध व्यक्त केला. जोपर्यंत प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत कार्यक्रम सुरु करु देणार नाही, असा पवित्रा प्रेक्षकांनी घेतला होता. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले.
अखेर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. (Marathi Marginalized)
हेही पहा –