- प्रतिनिधी
दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले मराठी साहित्य संमेलन होय, हे येथे उल्लेखनीय.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार म्हणाले की, दिल्लीत 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan) तालकटोरा स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र, पंतप्रधानांचे उद्घाटनाला येण्याचे निश्चित झाले की हे संमेलन विज्ञान भवनात घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
(हेही वाचा – मुंबईवर कर्नाटकचा हक्क; काँग्रेस आमदार Laxman Savadi यांनी उधळली मुक्ताफळे)
71 वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. काकासाहेब गाडगीळ स्वागताध्यक्ष होते. आगामी संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर या आहेत. अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या सहाव्या महिला होय, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने संमेलनाबाबत (Marathi Sahitya Sammelan) विचारपूस केली त्यावरून त्यांची येण्याची इच्छा आहे असे दिसून येते, असे पवार म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण दिले जाणार आहे.
(हेही वाचा – खुल्या मनाने जनादेश स्वीकारा; अधिवेशनात CM Devendra Fadanvis यांची विरोधकांना टोलेबाजी)
तालकटोरा स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे. 21 फेब्रुवारीला गंभ दिंडी निघणार आहे. तर 1500 साहित्यिकांच्या निवासाची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केली जात असल्याचे शैलेश पगारिया यांनी सांगितले.
नानक साई फाउंडेशनच्यावतीने नांदेड ते दिल्लीत अशी ‘संत नामदेव साहित्य दिंडी’ काढली जाणार असल्याची माहिती सरहदचे प्रमुख संजय नाहर यांनी दिली. साहित्य संमेलनाला (Marathi Sahitya Sammelan) पाकिस्तानमधील मराठी भाषिकांची सुद्धा यायची इच्छा आहे. कराचीमध्ये 100 लोकांची संस्था आहे. त्यांच्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा केली जाणार आहे. शरद पवार हे 46 देशांतील मराठी भाषिकांच्या संघटनेचे अध्यक्ष होते.
(हेही वाचा – Parliament Winter Session : संसदेचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित; राहुल गांधींच्या गुंडगिरीमुळे भाजपा खासदार रुग्णालयात दाखल)
रोहित टिळक यांनी ‘लाल बाल पाल’ यांचा गौरव करण्याची सूचना केली आहे. महाराष्ट्रातील खासदारसुद्धा त्यांच्या भागातून येणाऱ्या साहित्यिकांची व्यवस्था त्यांच्या निवासस्थानी करणार आहेत.
शरद पवार शुक्रवारी बीड आणि परभनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वातावरण बिघडले आहे. एका समाजाचे हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाची माणसे तेथे चहासुद्धा प्यायला जात नाही, एवढी तेढ निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्यादृष्टीने ही बाब योग्य नाही, असे पवार म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community