मुंबई शहरात दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Sign Boards) लावण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) मुदत दिली होती. ही मुदत संपली आहे. त्याअनुषंगाने महापालिका (BMC) दंडात्मक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. राज ठाकरे यांनी सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केल्याने आता मनसेचे खळखट्याक पुन्हा सुरु होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे (raj thackeray) पुणे येथे आले असता, त्यांनी याविषयीच्या सरकारच्या धोरणांवर टीका केली.
(हेही वाचा – Legislative Winter Session : अधिवेशन तोंडावर आहे, जरा सतर्कतेने काम करा)
कारवाई का करत नाहीत ?
बाळासाहेबांचे (Bal Thackeray) विचार विचार म्हणतात आणि मग कारवाई का करत नाहीत ? शासनाचा धाक नावाची काही गोष्ट आहे की नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. पाषाण भागात मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ठाकरे माध्यमांशी बोलत होते.
मनसेने मराठी पाट्यांच्या मुद्यावरून पुन्हा खळखट्याक केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेचे याविषयी कान टोचले. मनसेने मुंबई (Mumbai), ठाणे, नाशिकसह इतर शहरांतील इंग्रजी पाट्या हटवल्या. या विषयावर राज्य सरकारच्या बोटचेप्या भूमिकेकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. हे सरकार अनेक मुद्यांवर केवळ तोंडच वाजवते, असे ते म्हणाले. (Marathi Sign Boards)
पोलिसांना 24 तास मोकळीक द्या
पुण्यात वारंवार सापडणारे अमली पदार्थांचे साठे (Drugs), ललित पाटील प्रकरण याविषयी बोलतांना ठाकरे यांनी पोलिसांवर विश्वास व्यक्त केला. ‘वाढलेली गुंडगिरी, ड्रग्ज प्रकरणात पोलिसांना 24 तास मोकळीक द्या, ते सर्व मोडीत काढतील. यामागे कोण आहे. पैसा येतो कुठून’, असे राज ठाकरे म्हणाले. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातील प्रश्नांचे उत्तर देणे राज ठाकरे यांनी टाळले. (Marathi Sign Boards)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community