दिल्लीतील जेएनयूमध्ये मराठी अध्यासन सुरु होणार ?; मंत्री Uday Samant यांचे संकेत

Uday Samant : २० वर्षांपूर्वी जेएनयूमध्ये मराठी अध्यासन सुरू करण्यासाठी दिले होते १ कोटी रुपये

35

गेल्या २० वर्षांपासून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) मराठी अध्यासन सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्या प्रयत्नांना आता मूर्त रूप येईल, असे चित्र आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विविध विद्यापीठांमधून भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून प्रयत्न होणार आहेत. गेल्या २० वर्षांपूर्वी जेएनयूमध्ये मराठी अध्यासन सुरू करण्यासाठी १ कोटी रुपये देण्यात आले होते. हा निधी अपुरा पडत असल्याने आणखी ९ कोटी रुपयांची मागणी करण्यात येणार आली आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या विषयावर सकारात्मकता दाखवली होती, तर आता मराठी भाषा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले.

(हेही वाचा – Ind vs Eng, 3rd ODI : ‘रणजी सामन्याचा फायदा झाला असं रवींद्र जडेजा का म्हणतो?)

जेएनयूला ९ कोटी रुपये निधी देण्यासंदर्भात एक निवेदन दिल्लीतील साहित्य संमेलनाची (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) निमंत्रक सरहद संस्थेने सरकारला दिले आहे.

जेएनयूमधील या अध्यासनाला ज्ञानपीठ पुरस्कार (Jnanpith Award) प्राप्त कुसुमाग्रज तथा. वि. वा. शिरवाडकर यांचे नाव द्यावे अशी मागणीही साहित्य वर्तुळातून होत आहे. त्यामुळे या संमेलनात कुसुमाग्रज यांच्याच नावाने हे अध्यासन जेएनयूमध्ये सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.