संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मराठीला अभिजात दर्जा मिळणार?

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी वारंवार होत आहे, परंतु त्यावर अद्याप निर्णय होत नाही, अशा वेळी शिवसेनेचे नेते, खासदार राहुल शेवाळे यांनी थेट साहित्य अकादमीच्या सचिवांची भेट घेऊन मागणी केली, तेव्हा त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय याच संसदीय अधिवेशनात घेण्यात येईल, असे आश्वासन साहित्य अकादमीचे सचिव श्रीनिवासन राव यांनी दिले.

अमित शहा घालणार लक्ष 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात साहित्य अकादमीकडून केंद्रीय गृहमंत्रालयाकडे अहवाल सोपवला गेला आहे. त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून त्याची अंमलबजावणी होईल. त्यानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय नवीन अहवाल सादर करेल. तिन्ही मंत्रालयाच्या माध्यमातून तातडीने कार्यवाही केली जाईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात दिल्लीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः लक्ष घालणार आहेत अशी माहिती आहे. यासंबंधी नेमण्यात आलेल्या कमिटीतील दोन सदस्य निवृत्त झाले आहेत, ते सदस्य नव्याने नियुक्त केले जाणार आहेत.

(हेही वाचा कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here